Poco C51 : पोकोचा नवीन स्मार्टफोन लॉन्च; जाणून घ्या Poco C51 च्या फीचर्सबद्दल

पोकोच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले उपलब्ध
Poco C51
Poco C51esakal
Updated on

Poco C51 : सध्या मोबाईल कंपन्यांकडून स्मार्टफोन युजर्सना आकर्षित करण्यासाठी चांगलीच स्पर्धा लागलेली दिसते. या कंपन्यांकडून स्मार्टफोन्समध्ये वेगवेगळ्या फीचर्सची भर घालून बाजारात आणत असतात.

Poco C51
IPL 2023 Livestream : विना अडथळा मॅच बघण्यासाठी असा वाढवा WiFi चा स्पीड

तुम्ही जर चांगल्या फीचर्ससोबत बजेट फ्रेंडली स्मार्टफोन घ्यायचा विचार करत असाल तर पोको या स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीने दहा ते बारा हजार रुपयांच्या रेंजमधील फोन ग्राहकांसाठी आणला आहे. कंपनीने Poco C51 हा मोबाईल फोन आज लाँच केला आहे. यामध्ये युजर्सना 7GB चा रॅम मिळणार आहे. या स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊया.

Poco C51
Amazon Discount : आता अर्ध्या किमतीत स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची उत्तम संधी

Poco C51 चे फीचर्स : पोकोच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले उपलब्ध असून 120hz इतका रिफ्रेश रेटचा सपोर्ट असणार आहे. त्यामुळे चांगले फोटोज पाहायला मिळणार आहेत.

Poco C51
WhatsApp Secret Chat : WhatsApp चं नवं फिचर; आता कोणीच वाचू शकणार नाही तुमची सीक्रेट चॅट

या स्मार्टफोनमध्ये युजर्सना 4GB रॅम उपलब्ध करुन देण्यात आली असून 7GB पर्यंत एक्स्पांडेबल असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000 MAh इतकी शक्तिशाली बॅटरी उपलब्ध असणार असून MediaTek Helio G36 प्रोसेसरसोबत फोन मिळणार आहे.

Poco C51
Top 5 Sedan Cars : आता 8 लाखात खरेदी करा या सेडान कार्स

सोबत 10 वॅटचा चार्जर असणार आहे. तसेच ज्यांना फोटेग्राफीची आवड किंवा छंद आहे, अशा फ्रेशर्स फोटोग्राफर्सना या बजेट फ्रेंडली मोबाईल फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा ड्यु्एल AI कॅमेरा उपलब्ध असणार आहे. यासोबत 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. हा मोबाईल फोन अँड्रॉईड 13 वर काम करतो.

Poco C51
Amazon Discount : आता अर्ध्या किमतीत स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची उत्तम संधी

यासोबत पोकोकडून दोन वर्षापर्यंतचा सिक्युरिटी अपडेटही मिळणार आहे. यामागे युजर्सच्या सुरक्षिततेचा विचारही केलेला दिसून येतो. दहा ते बारा हजार रुपयांच्या रेंजमध्ये मोबाईलची किंमत पोकोच्या या नवीन व्हेरियंटच्या फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB इतका इंटर्नल स्टोरेज उपलब्ध करुन दिलेला आहे.

Poco C51
Netweb Technologies IPO : लवकरच नेटवेब टेक्‍नोलॉजीजचा आयपीओ येणार

कंपनीने स्मार्टफोनची किंमत परवडणारी ठेवली असून 10 हजार ते 12 हजार रुपयांच्या रेंजमध्ये फोन उपलब्ध असणार आहे. Poco C51 हा स्मार्टफोन आजपासून फ्लिपकार्टच्या वेबसाईटवरुन ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध असणार असल्याचे समजतं. त्यामुळे चांगल्या फीचर्ससोबत बजेट फ्रेंडली मोबाईल फोनच्या शोधात असणाऱ्यांना पोकोचा Poco C51 हा चांगला ऑप्शन ठरु शकतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.