इच्छामरणासाठी तयार झाली मशीन, झोपताच 10 मिनिटात मृत्यू, जगभरातून बंदीची मागणी

Euthanasia in India: भारतात 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने इच्छा मृत्यूला (पॅसिव्ह इथुनेशिया) परवानगी दिली. आपला अखेरचा श्वास कधी घ्यावा, हे ठरविण्याचा अधिकार मरणासन्न व्यक्तीला आहे, असे मत यावेळी न्यायालयाने नोंदविले होते.
Portable Suicide Pod To Be Used In Switzerland Soon
Portable Suicide Pod To Be Used In Switzerland Soon eSakal
Updated on

भारतात 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने इच्छा मृत्यूला (पॅसिव्ह इथुनेशिया) परवानगी दिली. आपला अखेरचा श्वास कधी घ्यावा, हे ठरविण्याचा अधिकार मरणासन्न व्यक्तीला आहे, असे मत यावेळी न्यायालयाने नोंदविले होते. दरम्यान, न्यूयॉर्क पोस्ट वेबसाइटनुसार, स्वित्झर्लंडमध्ये एक सुसाइड पॉड वापरण्याची चर्चा सुरु झाली आहे. ज्याचे नाव सारको आहे, परंतु त्याला "टेस्ला ऑफ इच्छामरण" म्हटलं जात आहे.

जे लोक आजारपणाला कंटाळलेलं असतात ते लोक देवाकडे इच्छामरण मागत असतात, अशा लोकांसाठी हे मशीन तयार करण्यात आलं आहे. 2019 मध्ये व्हेनिस डिझाइन फेस्टिव्हलमध्ये या मशीनचे पहिल्यांदा अनावरण करण्यात आले. हा थ्रीडी प्रिंटेड कॅप्सूलचा प्रकार आहे.

फक्त 10 मिनिटात मृत्यू होतो

या मशीनमध्ये बटन दाबताच आतील नायट्रोजनची पातळी झपाट्याने वाढते. अवघ्या 5 सेकंदात व्यक्ती ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बेशुद्ध पडतो आणि 10 मिनिटांतच त्याचा वेदनारहित मृत्यू होतो.

स्वित्झर्लंडची 'द लास्ट रिसॉर्ट' संस्था इच्छामरणाच्या बाजूने आवाज उठवत आहे. या पॉडपासून कोणतेही नुकसान होत नाही, आणि ते सहज वापरता येते, असा या संस्थेचा विश्वास आहे. स्वित्झर्लंडमध्ये इच्छामरण कायदेशीर आहे, परंतु स्विस क्रिमिनल कोडच्या कलम 115 मध्ये असे म्हटले आहे की आत्महत्येस मदत करणे हा स्वार्थी कारणांसाठी केलेला गुन्हा आहे.

जन्मापेक्षा मृत्यू स्वस्त

ही सेवा लोकांना फक्त 20 डॉलर्समध्ये, म्हणजे सुमारे 1600 रुपयांमध्ये दिली जाईल आणि ज्याचे किमान वय 50 वर्षे असेल. जर कोणी 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे असेल आणि गंभीरपणे आजारी असेल, तर तो देखील ही सेवा वापरू शकतो.

लास्ट रिसॉर्टचे मुख्य कार्यकारी सांगतात की, अनेकांनी या मशीनची मागणी केली आहे, त्यामुळे कदाचित लवकरच ते वापरले जाईल.

NDTV नुसार, लास्ट रिसॉर्टच्या सल्लागार मंडळातील वकील, फिओना स्टीवर्ट म्हणतात की, या क्षणी हे ठरवले गेले नाही की पहिला वापरकर्ता कोण असेल आणि मृत्यूचे स्थान काय असेल.

हे मशीन केवळ खाजगी मालमत्तेवर, तसेच निर्जन ठिकाणी वापरले जाईल. NDTV च्या रिपोर्टनुसार, त्याचा पहिला यूजर या वर्षीच असू शकतो.

अनेक लोक त्यावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत, कारण त्यांच्या मते हे मशीन नैतिकदृष्ट्या योग्य नाही. हे मशीन वापरताना डॉक्टरांची गरज नाही. अशा परिस्थितीत कोणीतरी जाणूनबुजून कोणाचा खून करू शकतो, असा प्रश्नही लोक उपस्थित करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com