Love Brain Disorder : प्रेमात वेडी? तरुणीने बॉयफ्रेंडला एका दिवसात केले 100 हून अधिक फोन; डॉक्टर म्हणतात हा 'लव्ह ब्रेन' आजार

Mad in Love : या तरुणीने आपल्या प्रियकराला एक दिवशी फोन केला होता. मात्र त्याने फोन न उचलल्याने पॅनिक होऊन तिने तब्बल 100 हून अधिक वेळा त्याला कॉल आणि मेसेज केले.
Love Brain Disorder
Love Brain DisordereSakal
Updated on

Love Brain Disorder : प्रेमात लोक वेडे होतात हे तुम्ही ऐकलं असेलच. मात्र, ही केवळ बोलण्याची पद्धत नसून, असं खरंच शक्य असल्याचं चीनमधील डॉक्टरांनी म्हटलं आहे. चीनमध्ये एका तरुणीला 'लव्ह ब्रेन' नावाचा आजार झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. प्रेमात आंधळ्या झालेल्या या तरुणीने आपल्या प्रियकराला एवढा त्रास दिला, की त्याला पोलिसांमध्ये तक्रार करावी लागली.

या तरुणीने आपल्या प्रियकराला एक दिवशी फोन केला होता. मात्र त्याने फोन न उचलल्याने पॅनिक होऊन तिने तब्बल 100 हून अधिक वेळा त्याला कॉल आणि मेसेज केले. त्यानंतरही त्याने रिप्लाय दिला नाही तेव्हा तिने घरातील सामानाची तोडफोड सुरू केली. तसंच बाल्कनीमधून उडी मारण्याची धमकीही देऊ लागली. यानंतर या तरुणाने पोलिसांना पाचारण केले. लाईव्ह हिंदुस्तानने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीचं नाव जियाओयू असं आहे. पोलिसांनी तिची मानसिक स्थिती पाहता तिला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी सांगितलं, की या तरुणीला बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा आजार झाला आहे. साध्या भाषेत याला लव्ह ब्रेन असं म्हटलं जातं. (Borderline Personality Disorder)

Love Brain Disorder
Delusional Love Disorder : 'असं वाटतं कॉलेजमधील सगळ्या मुली माझ्या प्रेमात..', तरुणाला झाला विचित्र आजार; डॉक्टर म्हणतात..

डॉक्टरांनी सांगितलं, की जियाओयू ही कॉलेजच्या दिवसांपासूनच अशा प्रकारे वर्तन करत होती. पहिल्या वर्षाला शिकत असतानाच ती आपल्या प्रियकराशी भरपूर अटॅच झाली होती. अगदी छोट्या-छोट्या गोष्टी ती त्याच्यासोबत शेअर करत होती. तसंच, तो कुठे आहे, काय करतो आहे हे जाणून घेण्यासाठी ती दिवसातून शेकडो वेळा त्याला कॉल आणि मेसेज करत होती.

काय आहे लव्ह ब्रेन?

लव्ह ब्रेन ही काही मेडिकल टर्म नाही. जेव्हा प्रेमी युगलांमधील एकमेंकांप्रती असणारा पझेसिव्हनेस धोकादायक स्तरावर जातो, तेव्हा त्याला लव्ह ब्रेन म्हटलं जाऊ शकतं. सध्या चीनमधील या तरुणीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तेथील डॉ. डू ना यांनी सांगितलं, की चिंता, तणाव आणि इतर कारणांमुळे हा आजार होऊ शकतो. तसंच ज्यांचे लहानपणी आई-वडिलांशी नीट संबंध नव्हते, त्या व्यक्तींना याचा सर्वाधिक धोका असतो असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.