5 Cars Place In October : जर तुम्ही चार चाकी गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे. ऑक्टोबर महिन्यात नव्या गाड्या बाजारात दाखल होणार आहेत. यासाठी किती बजेट करावं लागेल याची माहिती या बातमीतून जाणून घ्या.
जर सणासुदीच्या काळात तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कार खरेदी करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीला कोणती कार चांगली आहे, कोणाचे फीचर्स आणि मायलेज चांगले आहे यावर खूप डोकं लावावं लागतं. एका बाजूला लाखो रुपये खर्च करत असताना अत्याधुनिक आणि उत्तम कार घ्यायची प्रत्येकाची इच्छा असते. इथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की या महिन्यात कोणत्या कार बाजारात दाखल होणार आहेत. जेणेकरून या गाड्या खरेदी करण्यासाठी तुम्ही तुमचे बजेट आधीच तयार करू शकाल.
Nissan Magnite
रिपोर्ट्सनुसार, निसान या महिन्यात त्याच्या सब-फोर मीटर एसयूव्ही मॅग्नाइटचा AAMT प्रकार लॉन्च करू शकते. सध्या ही एसयूव्ही सीव्हीटी ट्रान्समिशनसह बाजारात विकली जाते. नवीन ट्रान्समिशन व्यतिरिक्त या SUV मध्ये तुम्ही इतरही अनेक बदल पाहू शकता. ज्यामध्ये इंटीरियर आणि काही फीचर्स देखील देण्यात येणार आहेत. कंपनी या SUV ची नवीन एडिशन Kuro देखील या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये लॉन्च करू शकते. सध्या त्याच्या नवीन एडिशनचे बुकिंग सुरू झाले आहे.
Tata Punch Electric
टाटा कंपनी या महिन्यात एसयूव्ही पंचची इलेक्ट्रिक व्हेरिएंट बाजारात आणू शकते. या वर्षाच्या अखेरीस तीन इलेक्ट्रिक एसयूव्ही सादर केल्या जाऊ शकतात. कंपनीने सप्टेंबर महिन्यात आपली Nexon EV फेसलिफ्ट लॉन्च करून याची सुरुवात केली आहे. लॉन्चपूर्वी, ईव्हीची रस्त्यांवर चाचणी होताना दिसली आहे.
Lexus LS
लक्झरी कार मॅन्यूफॅक्चरर Lexus त्यांची LM MPV या महिन्यात लॉन्च करू शकते. ही एमपीव्ही टोयोटा वेलफायर प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. कंपनीने ऑगस्ट महिन्यापासूनच या कारसाठी बुकिंग सुरू केले होते.
Force Gurkha
कंपनी या महिन्यात फाईव्ह डोअर व्हर्जन लाँच करू शकते. रिपोर्ट्सनुसार, ही SUV लॉन्च होण्यापूर्वी टेस्टिंग दरम्यान अनेक वेळा स्पॉट झाली आहे. आगामी कारमध्ये तीन रो सीट्स दिसण्याची शक्यता आहे.
BYD Seal
ही इलेक्ट्रिक कार थायलंडमध्ये 30 ते 37 लाख रुपये किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. ही कार लवकरच भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. जर ही कार भारतात आली तर तिची संभाव्य किंमत 60 लाख रुपये असू शकते. सध्या कंपनीकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.