Proba-3 Mission : सूर्याला लागणार आर्टिफिशियल ग्रहण; इस्रो प्लॅन करतंय मोहीम, या दोन उपग्रहांचं होणार लाँचिंग,जाणून घ्या

Artificial Solar Eclipse Mission : पहिल्यांदाच लागणार असं आर्टिफिशियल ग्रहण; सूर्याच्या बाहेरील थराचा होणार अभ्यास
Proba-3 Mission of ESA and ISRO
Proba-3 Mission of ESA and ISROesakal

ESA-ISRO Mission : सूर्यग्रहणाबद्दल आपल्याकडे अनेक गोष्टी मानल्या जातात. वेवेगळ्या रूढी प्रचलित आहेत. अश्यात सूर्यग्रहण ही खगोलीय घटना म्हणूनच आपल्या सर्वांना परिचित आहे. पण यापुढे सूर्यग्रहण फक्त आकाशातच नाही तर अंतराळातही पाहायला मिळणार आहे.

युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांच्या संयुक्त प्रयत्नात 'प्रोबा-३' (PROBO-3) नावाच्या आधुनिक यंत्राची लवकरच अंतराळात मोहीम राबवली जाणार आहे. ही मोहीम खास आहे कारण याद्वारे कृत्रिम सूर्यग्रहण तयार केले जाणार आहे.

आजवर सूर्यग्रहण ही एखाद्या खगोलीय घटनेमुळे घडणारी घटना मानली जायची. पण प्रोबा-३ या मोहिमेद्वारे पहिल्यांदाच दोन उपग्रह मिळून कृत्रिम सूर्यग्रहण निर्माण करणार आहेत. या दोन उपग्रहांमध्ये नेमके 144 मीटर इतके अंतर राहील आणि एका उपग्रहाची सावली दुसऱ्या उपग्रहावर पडेल. त्यामुळे दुसऱ्या उपग्रहाला सूर्य पूर्णपणे दिसणार नाही. जसे आपण पृथ्वीवर सूर्यग्रहण अनुभवतो तसे हे ग्रहण नसले तरी सूर्यविज्ञानाच्या अभ्यासासाठी उपयुक्त असेल.

Proba-3 Mission of ESA and ISRO
Fridge Use Tips : पावसाळ्यात फ्रीज काही तासांसाठी बंद ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? जाणून घ्या एका क्लिकवर

सूर्य हे आपल्या सौरमालेतील सर्वात तेजस्वी खगोलीय पिंड आहे. त्याच्या अती तेजस्वी प्रकाशामुळे सूर्याच्या आत असलेल्या इतर किरणोत्सर्गांचे अवलोकन करणे कठीण होते. प्रोबा-३ च्या मदतीने सूर्याच्या बाहेरील थराचा अभ्यास करणे सोपे होणार आहे. कारण सूर्यबिंबाचा प्रकाश रोखून हा थर स्पष्टपणे दिसणार आहे.

Proba-3 Mission of ESA and ISRO
Loki Dinosaur : सुरीसारखी शिंगे, 5 टन वजन; मार्वलमधील 'लोकी'ची आठवण करून देणाऱ्या डायनोसरच्या नव्या प्रजातीचा शोध

सूर्यबिंबाचे पृष्ठभाग (photosphere) हे सुमारे 5500°C इतके तप्त असते तर बाहेरील थर मात्र 1-3 दशलक्ष°C इतके तप्त असते. सूर्यमालेतील या रहस्यात्मक थराचा अभ्यास करण्यासाठी Probo-3 मोहीम खूप महत्वाची ठरणार आहे.

या मोहिमेद्वारे अंतराळातील अनेक रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अंतराळातील संशोधनात भारताचा वाटा वाढत आहे ही अभिमानास्पद बाब आहे.इस्रोसह भारतवासीयांना देखील या मोहिमेकडून खूप अपेक्षा आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com