मुंगळा ( जि. वाशीम) : मुंगळा येथील भूमिपुत्र आणि वडोदराच्या पारुल विद्यापीठातील प्राध्यापक संशोधक डॉ. विजय दत्तराव केळे यांच्या आंब्याच्या कोयीपासून बी १२ जीवनसत्व निर्माण करणाऱ्या संशोधनाच्या पेटंटची पाहणी करण्यासाठी अमेरिकेतील सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि थॉमस एडिसन पेटंट पुरस्कार विजेते डॉ. गोर्धन पटेल यांनी वडोदरा येथे केळे यांच्या संशोधन प्रयोगशाळेला भेट दिली.