राज्यात आता PUC चाचणी करणं महागलं; जाणून घ्या नवे दर

आता दुचाकी आणि चारचाकी वाहनांची पीयुसी तपासणी करणं महागलं आहे.
Transport Commissioner gives explanation PUC rates have not been increased
Transport Commissioner gives explanation PUC rates have not been increased
Updated on

PUC TEST PRICE INCREASED IN MAHARASHTRA: गेल्या काही दिवसांपासून महागाईनं कळस गाठला आहे. पेट्रोल-डिझेल, गॅस सिलेंडर सर अनेक गोष्टींच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. आता या महागाईमध्ये आणखी भर पडली आहे. वाहनांतून निघणाऱ्या धुरामुळे होणारं प्रदुषण टाळण्यासाठी दिल्या जाणाऱ्या पीयुसीसाठी (Pollution under Control) आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. आता दुचाकी आणि चारचाकी वाहनांची पीयुसी तपासणी करणं महागलं आहे. दुचाकीच्या पीयुसीसाठी आता 35 रुपयांऐवजी 50 रुपये आकारले जातील, तर चारचाकी वाहनांच्या 90 रुपयांऐवजी 125 रुपये मोजावे लागतील. याशिवाय डिझेल कार आणि एसयूव्हीसाठीची पीयुसी काढण्यासाठीदेखील 150 रुपये आकारले जातील. पूर्वी त्यासाठी 110 रुपये मोजावे लागत असत. परिवहन खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने टाईम्स ऑफ इंडियाला याबाबत माहिती दिली.

Transport Commissioner gives explanation PUC rates have not been increased
PUC सर्टिफिकेट नसेल तर आता RC जप्त; 1 जानेवारीपासून वाहतुकीचे नियम कडक

सध्या राज्यात सुमारे 2400 पीयूसी केंद्र असून तेथे वाहनांची तपासणी करून पीयूसी सर्टीफिकेट दिलं जाते. सध्या पीयूसीमध्ये दरवाढ झाली असली तरी या दरवाढीवर पीयूसी केंद्र चालक समाधानी नाहीत. 2020पासून सुरु झालेल्या ऑनलाईन प्रणालीमुळे पीयुसी केंद्र चालकांच्या खर्च वाढला असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. गेल्या अकरा वर्षात पीयूसीच्या दरात वाढ झाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Transport Commissioner gives explanation PUC rates have not been increased
विमा नूतनीकरणासाठी वैध PUC प्रमाणपत्र दिलं जातंय का? निर्देशांच्या पालनासाठी विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार

आम्ही बऱ्याच काळापासून दरवाढीची मागणी करत आहोत. त्यासाठी न्यायालयीन लढा देत आहोत. आम्ही दुचाकी वाहनांसाठी 120 रुपये, चार तीन वाहनांसाठी 150 रुपये तसेच पेट्रोलवरील चारचाकीला 250 तर डिझेलवर चालणाऱ्या कारसाठी 300 रुपये आणि अवजड वाहनांसाठी 350 रुपये शुल्क असावे, अशी मागणी केली होती, असं अखिल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण संघटनेचे अध्यक्ष संदीप भंडारे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()