Indus Battle Royale: बॅटल रॉयलचे भारतीय व्हर्जन; गेमिंग इंडस्ट्रीत पुण्याची कंपनी ठरणार 'सरताज'

Indus Battle Royale: बॅटल रॉयलच्या विश्वात आजवर अनेक गेम्स आल्या आणि गाजल्या देखील, पण सध्या पुण्यातील एका गेमिंग कंपनीने बॅटल रॉयल गेमचे भारतीय व्हर्जन डिझाईन केले असून, ही गेम गेमिंग विश्वात धुमाकूळ घालण्यास सज्ज झालीय.
बॅटल रॉयालचे भारतीय व्हर्जन; गेमिंग इंडस्ट्रीत पुण्याची कंपनी ठरणार 'सरताज'
Indus Battle RoyaleE-Sakal
Updated on

प्रमोद यादव

Indus Battle Royale

डिजिटल स्क्रिनवर प्रत्यक्ष युद्ध लढण्याचा अनुभव देणारी पब्जी सारखी बॅटल रॉयल गेम अल्पावधीत तरुणांमध्ये प्रसिद्ध झाली. शत्रुचा खात्मा करत नवे नवे वेपन्स मिळवून अधिक शक्तीशाली होत जाण्याचा आव्हानात्मक डिजिटल प्रवास म्हणजे 'बॅटल रॉयल'.

या बॅटल फिल्डच्या दुनियेत बीजीएमआय, कॉल ऑन ड्युटी, अपेक्स लिजन्ड, फोर्टनाईट यासारख्या गेम्स देखील प्रचंड गाजल्या आणि आजही कोट्यवधी तरुण त्या गेम्स खेळतायेत.

यात आता पुण्यात डिझाईन केलेली 'इंड्स बॅटल रॉयल' गेम गेमिंगच्या दुनियेतील वेगळा आणि चित्तथरारक अनुभव देण्यासाठी सज्ज झालीय. भारतीय पौराणिक पात्रांशी मिळतीजुळते अवतार, अत्याधुनिक शस्त्रे आणि अधिक आव्हानात्मक होत जाणारे टार्गेट हे या गेमचे वैशिष्टय आहे.

मास्कगन, बॅटल स्टार्स आणि सिली रॉयाल यासारख्या गेम्स डिझाईन केलेल्या पुण्यातील सुपरगेमिंग कंपनीने 'इंड्स बॅटल रॉयल' ही नवी गेम डिझाईन केली आहे.

'पात्रांचे भारतीय वाटणारे आकर्षक आवतार, अत्याधुनिक शस्त्रे, बॅटल फिल्डच्या भाव विश्वात खिळवून ठेवणारे 'वीरलोक' (गेमचे बॅटल फिल्ड) आणि आव्हानात्मक लढाई या गोष्टी इंड्स बॅटल रॉयलला युनिक बनवतात,' असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रॉबी जॉन सांगतात.

बॅटल रॉयालचे भारतीय व्हर्जन; गेमिंग इंडस्ट्रीत पुण्याची कंपनी ठरणार 'सरताज'
Anti-Theft Feature : मोबाईल चोरांचे वाईट दिवस सुरु! गुगल आणतंय 'हे' नवीन AI फिचर,जाणून घ्या

कंपनीच्या वतीने अलिकडेच 'इंड्स इन्फेर्नो' स्पर्धा घेण्यात आली. यात अंतिम स्पर्धेत 15 टीम अडीच लाखांच्या बक्षिसासाठी लढत होत्या. यामध्ये मॉगर्स टीम पहिला क्रमांक पटकावत अडीच लाखांचे कॅश प्राईस जिंकले.

यासह डीजीई (दुसरा क्रमांक - एक लाख बक्षीस), इन्सेन ई-स्पोर्ट्स (तिसरा क्रमांक - 75,000) आणि मार्कोस (चौथा क्रमांक - 50,000) रुपये पटकावले. तर, मॉगर्स टीमच्या आयगॉरला मोस्ट व्हल्युएबल प्लेअरचा 25,000 रुपये देऊन गौरव करण्यात आला.

Indus Inferno Tournament
Indus Inferno TournamentE-Sakal
बॅटल रॉयालचे भारतीय व्हर्जन; गेमिंग इंडस्ट्रीत पुण्याची कंपनी ठरणार 'सरताज'
Smartphone Tips : मोबाईल सर्व्हिस सेंटरला देताना करू नका 'या' चुका; होऊ शकतं मोठं नुकसान,जाणून घ्या

काय आहे 'इंड्स बॅटल रॉयाल'?

'इंड्स बॅटल रॉयल' साहसी युद्ध प्रकारातील एक नवीन गेम आहे. इंड्स व्हॅली सिव्हिलायझेशन ते अत्याधुनिक विकसित जग असे चित्रण या गेमच्या माध्यमातून उभारण्यात आले आहे.

या गेममधील युद्धभूमीला वीरलोक असे नाव देण्यात आले आहे. यातील पात्र देखील पौराणिक संदर्भाशी मुळतीजुळती आहेत. यामध्ये सरताज, पोखरण, हिना, मोरणी, मेक - बालिका, आदि, राणा, दिया यासारखे अवतार आहेत.

गेममध्ये देवस्त्र, किस्मत, क्रोध, उल्का, टेम्पेस्ट सीएफए, ए27 लोकस्ट, सीएस 10, वॅन्टेज, व्ही-फरी यासारखी शस्त्रे उपलब्ध आहेत. यामध्ये अधिक अत्याधुनिक शस्त्रे येत्या काळात वाढतील, असे गेमच्या एका शस्त्रे डिझायन करणाऱ्या अभियंत्याने सांगितले.

Characters And Weapons In Indus Battle Royale
Characters And Weapons In Indus Battle RoyaleE-Sakal
बॅटल रॉयालचे भारतीय व्हर्जन; गेमिंग इंडस्ट्रीत पुण्याची कंपनी ठरणार 'सरताज'
Lost Mobile : मोबाईल हरविल्यास चिंता सोडा.! केंद्राची यंत्रणा ठरतेय फायदेशीर; महाराष्ट्र देशात तिसऱ्या स्थानी

वीरलोक ज्याठिकाणी हे युद्ध होत आहे त्या ठिकाणी गुफा, गुरुकुल, लोक टर्मिनल, बाजार, विहार, हवेली, व्यापार केंद्र, विक्रम लॅब यासारखी लोकेशन आहेत. इंड्स बॅटल रॉयल गेममधील ठिकाणे, शस्त्रे आणि पात्रांची नावे भारतीय पौराणिक कथांच्या संदर्भाने ठेवण्यात आली आहेत.

जुन्या पद्धतीने नव्या गेम्स जिंकता येत नाहीत, अशी या गेमची ओळख कंपनी सांगते. प्रत्येक टीममध्ये चार खेळाडू याप्रमाणे यामध्ये जास्तीत जास्त 60 प्लेअर सहभागी होऊ शकतात. अखेरपर्यंत टीकून राहणारी टीम किंवा प्लेअर विजेता असेल. यामध्ये दुहेरी विजेतेपदाची संकल्पना देखील असून, त्याला 'कॉस्मियम क्लंच' देखील म्हटले जाते.

पराभव हाती लागलेला व्यक्ती ज्याच्याकडून पराभव मिळाला त्याचा बदला घेऊ शकतो, यासाठी 'ग्रज' नावाची संकल्पना गेममध्ये विकसित करण्यात आलीय.

सध्या गेम क्लोझ बिटामध्ये असून, एक कोटी दहा लाख लोकांनी पूर्व नोंदणी केली आहे. इंड्स बॅटल रॉयल लवकरच Android आणि iOS वर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.