Radio Sources in Space : मीरकॅट दुर्बिणीची कमाल! तब्बल 9 लाखांहून जास्त रेडिओ स्रोतांचा शोध,पुण्याच्या शास्त्रज्ञांना आलं मोठं यश

Astronomers Discover Over 9 Lakh Radio Sources with MeerKAT Telescope : दक्षिण आफ्रिकेतील मीरकॅट दुर्बिणीच्या साहाय्याने पुण्याच्या खगोलशास्त्रज्ञांचे निरीक्षण यशस्वी झाले आहे.
Astronomers Discover Over 9 Lakh Radio Sources with MeerKAT Telescope
Astronomers Discover Over 9 Lakh Radio Sources with MeerKAT Telescopeesakal
Updated on

Radio Sources in Space : दक्षिण आफ्रिकेतील ‘मीरकॅट रेडिओ’ दुर्बिणीच्या साहाय्याने केलेल्या निरीक्षणातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील खगोलशास्त्रज्ञांना तब्बल नऊ लाख ७१ हजार १८० रेडिओ स्रोतांचा शोध लागला आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच शास्त्रज्ञांना एकाच रेडिओ अवकाश सर्वेक्षणातून जवळपास १० लाख स्रोत हाती लागले आहेत. या शोधात पुण्यातील आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्रातील (आयुका) शास्त्रज्ञांचा सहभाग आहे.

मिरकॅट रेडिओ दुर्बिणीच्या साहाय्याने अवकाशातील रेडिओ स्रोतांची माहिती संकलित करून त्यांचा स्वतंत्र कॅटलॉग तयार करण्यात आला आहे. यानिमित्ताने ‘मीरकॅट’च्या साहाय्याने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे नोंदविलेल्या स्रोतांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा ‘कॅटलॉग’ तयार झाला आहे. दशलक्ष किंवा त्याहून जास्त स्रोत असलेल्या मूठभर रेडिओ कॅटलॉगपैकी हा एक कॅटलॉग असणार आहे. ‘मीरकॅट रेडिओ दुर्बिणीच्या साहाय्याने मिळालेल्या असंख्य सखोल प्रतिमांसह कच्च्या स्वरूपातील माहिती संकलित करून ठेवण्यासाठी अत्याधुनिक मांडणी भारतातील आयुकामध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे.

Astronomers Discover Over 9 Lakh Radio Sources with MeerKAT Telescope
Health Alert : अलर्ट! ७३% कॉलेजकुमारांना ‘टेक्स्ट नेक सिंड्रोम’; मोबाईल-संगणकाच्या वापराने होताहेत गंभीर परिणाम

दुर्बिणीच्या साहाय्याने संकलित झालेल्या प्रतिमा आणि कॅटलॉगचे विश्लेषण आणि त्यातील संशोधन नागरिकांसमोर आणण्याचे काम जर्मनीमधील मॅक्स प्लॅंक इन्स्टिट्यूट फॉर रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी (एमपीआयएफआर) येथे केले जात आहे.

सर्वेक्षणातील वैशिष्ट्ये

  • अवकाशात सापडले नऊ लाख ७१ हजार १८० रेडिओ स्रोत

  • तब्बल ३९१ बिंदूंच्या जागा निदर्शनास आल्या

  • रेडिओ स्रोतांचे सर्वाधिक अद्ययावत अवकाश सर्वेक्षण

Astronomers Discover Over 9 Lakh Radio Sources with MeerKAT Telescope
Brain Cancer : मोबाईल फोनच्या अतिवापराने मेंदूचा कर्करोग होत नाही? संशोधकांनी केला धक्कादायक खुलासा

आधुनिक रेडिओ दुर्बिणीच्या सातत्यपूर्ण सर्वेक्षणातील नवा कॅटलॉग अत्यंत विस्तारित असून महत्त्वपूर्ण आहे. हे आधुनिक आणि सखोल रेडिओ अवकाश सर्वेक्षण आहे. याद्वारे आकाशगंगा आणि विश्वाच्या उत्क्रांतीशी संबंधित अनेक गूढ बाबींची उकल होऊ शकेल,असे डॉ. नीरज गुप्ता, शास्त्रज्ञ, आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.