Rakesh Sharma : भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मांचा आज वाढदिवस; ते सध्या काय करतात?

राकेश शर्मा हे भारतीय एअर फोर्समध्ये विंग कमांडर होते. वयाची 23 वर्षे पूर्ण करण्यापूर्वीच त्यांनी मिग-21 या फायटर जेटमधून 21 वेळा उड्डाण केलं होतं.
Rakesh Sharma
Rakesh SharmaeSakal
Updated on

Rakesh Sharma Birthday : भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांचा आज वाढदिवस आहे. 13 जानेवारी 1949 रोजी पटियालामध्ये त्यांचा जन्म झाला होता. 3 एप्रिल 1984 रोजी अंतराळात पोहोचणारे पहिले भारतीय होण्याचा मान त्यांना मिळाला होता. सुमारे आठ दिवस ते अंतराळात राहिले होते.

राकेश शर्मा (Rakesh Sharma) हे भारतीय एअर फोर्समध्ये विंग कमांडर होते. वयाची 23 वर्षे पूर्ण करण्यापूर्वीच त्यांनी मिग-21 या फायटर जेटमधून 21 वेळा उड्डाण केलं होतं. 1982 साली त्यांची अंतराळ यात्रेसाठी निवड झाली. इस्रो आणि सोव्हिएत संघ यांच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत सोयूज टी-11 या यानातून ते अंतराळात गेले होते. (Soyuz T-11)

सारे जहाँ से अच्छा..

सोयूज टी-11 मधील क्रूसोबत एका जॉइंट कॉन्फरन्समध्ये भारताने पहिल्यांदाच अंतराळातील आपल्या नागरिकासोबत गप्पा मारल्या होत्या. यावेळी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विचारलं होतं, की अंतराळातून भारत कसा दिसतोय? यावेळी उत्तर देताना राकेश शर्मा हिंदीतून म्हणाले होते, 'सारे जहाँ से अच्छा..'! (First Indian in Space)

Rakesh Sharma
ISRO 2024 Missions : पुढचं वर्षही गाजवणार 'इस्रो'; पहिल्या दिवसापासूनच होणार मोहिमांची सुरुवात! पाहा संपूर्ण यादी

तो क्षण होता 'बोरिंग'

राकेश शर्मांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, की सोयूज यानाच्या प्रक्षेपणादिवशी त्यांना अगदीच 'बोरिंग' वाटत होतं. या क्षणाचा सराव त्यांनी बऱ्याच वेळा केला होता. त्यामुळे त्या दिवशीही अगदी रुटीन असल्याप्रमाणेच सगळं पार पडलं, असं ते सांगतात.

ते सध्या काय करतात?

राकेश शर्मा हे सध्या कुन्नूर नावाच्या एका छोट्या गावात आपल्या पत्नीसोबत राहतात. प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर अगदी साधं आयुष्य ते जगत आहेत. अर्थात, ते अंतराळ मोहिमांपासून नक्कीच दूर झाले नाहीयेत. ते सध्या इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठी सल्लागार म्हणून मदत करत आहेत. गगनयान मोहिमेच्या माध्यमातून भारत पहिल्यांदाच स्वतः स्पेसमध्ये अंतराळवीर पाठवणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.