Special Helmet: दारू पिल्यास चालू होणार नाही तुमची गाडी, विद्यार्थ्यांनी बनवले खास हेल्मेट; पाहा वैशिष्ट्ये

रांची येथील सहावीतील विद्यार्थ्यांनी खास हेल्मेट तयार केले आहे. या हेल्मेटमुळे तुम्ही दारू पिऊन गाडी चालवू शकणार नाही.
Helmet
HelmetSakal
Updated on

Bike Helmet: ड्रिंक अँड ड्राइव्हची अनेक प्रकरणं समोर येत असतात. दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे अपघातांच्या घटनेत देखील वाढ झाली आहे. असे अपघात टाळण्यासाठी आता रांची येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी खास हेल्मेट तयार केले आहे. या विद्यार्थ्यांनी हेल्मेटमध्ये खास स्पेशल चिप बसवली आहे, ज्यामुळे दारू पिऊन गाडी चालवता येणार नाही.

रांची येथील सेंट झेव्हियर स्कूलच्या ४ विद्यार्थ्यांनी हेल्मेटचे प्रोटोटाइप तयार केले आहे. विद्यार्थ्यांनी सेंसर असलेल्या हेल्मेटचे प्रोटोटाइप तयार केले आहे. हेल्मेटमधील ही चिप बाइक राइडर नशेत असल्यास अलर्ट पाठवेल.

हेही वाचाः Credit Score: असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

कसे काम करेल हेल्मेट?

हेल्मेटने पाठवलेल्या अलर्टमुळे बाइक स्टार्ट होणार नाही. पुढे जाऊन आणखी एक नवीन चिप तयार करण्याचा विद्यार्थ्यांचा विचार आहे. यामुळे हेल्मेट नसल्यास अथवा व्यवस्थित न घातल्यास बाइक सुरू होणार नाही. या खास हेल्मेटला सेंट झेव्हियर स्कूलच्या सहावीतील ४ विद्यार्थ्यांनी तयार केले आहे.

Helmet
Mobile Recharge: Jio कडे आहे अवघ्या १५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन, मिळेल हाय-स्पीड डेटाचा फायदा; पाहा बेनिफिट्स

हेल्मेटमधील चिप दारूचा वास डिटेक्ट करेल व यामुळे बाइक स्टार्ट होणार नाही. विना हेल्मेट बाईक स्टार्ट होणार नाही, अशी चिप तयार करण्याचा देखील विद्यार्थ्यांचा मानस आहे. या प्रोटोटाइप हेल्मेटला अविराज सिंह, वत्सल सरावगी, पार्थ आणि आरव पोद्दार यांनी तयार केले आहे.

शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी सांगितले की, 'हेल्मेटला पूर्णपणे विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. आम्ही केवळ मार्गदर्शन केले.' दरम्यान, रस्ते अपघातात दरवर्षी हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. यातील अनेकांना हेल्मेट न घालणे, दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे प्राण गमवावा लावतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे हेल्मेट भविष्यात नक्कीच फायद्याचे ठरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.