पातूर : बालपणापासून मानवी जीवाला वेड लावणारे आकाश ग्रह-ताऱ्यांच्या सोबत क्वचित प्रसंगी एखादा चिरस्मरणीय प्रसंग आपणास अनोखा आनंद देऊन जातो. आपल्या सूर्यकुलाचे घटक असलेले धुमकेतू अति लंबवर्तुळाकार भ्रमण कक्षेत जेंव्हा पृथ्वी व सूर्याजवळ येतात तेंव्हा त्यांचे विलोभनीय दर्शन घडते. सध्या स्थितीत असाच एक नवा धुमकेतू ‘त्सूचिन्शान’ पृथ्वीच्या जवळ येत आहे.
आकाशातील एक अप्रतिम नजारा म्हणून आपण धुमकेतूची वाट पाहतो. १९८६ मध्ये आलेला हॅलेचा धुमकेतू अनेकांच्या स्मरणात असेल, हाच जेंव्हा १९१० साली आला तेंव्हा दिवसा सुद्धा दिसायचा. सूर्यमालेच्या बाहेर उर्ट क्लाऊडच्या पट्ट्यातून सूर्याभोवती फिरणारे हे धुमकेतू जेंव्हा पृथ्वी आणि सूर्याजवळ येतात तेंव्हा त्यांच्यात असलेल्या खडक, धूळ, बर्फ व वायूंच्या मिश्रणाच्या अनियमित गोळ्यातील घटकांचे रुपांतर सूर्यप्रकाश व उष्णतेने लांबलचक शेपटीत होते, यालाच काही लोक ‘शेंडे नक्षत्र’ म्हणून ओळखतात.
आकाशात दिसणारा हा धुमकेतू ‘त्सूचिन्शान एटलास’ किंवा सी२०२३ ए३ या नावाचा असून, त्याचा शोध गतवर्षी ता. ९ जानेवारीला पर्पल माउंटन वेधशाळेने लावला. परतीच्या पावसाला निरोप आणि येणाऱ्या धुमकेतूच्या स्वागताला आकाश मित्रांनी सज्ज व्हायचे आवाहन खगोल निरीक्षक प्रभाकर दोड यांनी केले.
दर्शनयोग्य कालावधी
येत्या ता. २७ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत हा आकाश पाहूणा सूर्य आणि पृथ्वी जवळ येत असल्याने त्याचे तेज वाढून आपण हा अनोखा नजारा सप्टेंबरच्या शेवटच्या टप्प्यात सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितिजावर सिंह राशी जवळ आणि ऑक्टोबरचे मध्यात सूर्यास्तानंतर पश्चिम आकाशात शूक्र ग्रहाजवळ बघता येईल. लक्षावधी किलोमीटर दूर असलेल्या या नव्या पाहूण्याचे दर्शनाचा दूर्लभ योग हजारो वर्षांनंतर जुळून येत आहे. या अनोख्या खगोलीय घटनेचा आनंद अवश्य घ्यायलाच हवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.