Paytm : फिनटेक कंपनी पेटीएमच्या मालकीची कंपनी One97 कम्युनिकेशन्सने 10 जूनला कर्मचारी कपात केल्याची घोषणा केली. कंपनीच्या म्हणण्यानुसार प्रभावित कर्मचाऱ्यांना सहकार्य देण्यासाठी मदत करत आहे.वृत्तानुसार,कंपनीने नेमके किती कर्मचारी काढून टाकले याचा मूळ आकडा जाहीर केलेले नाही.
मात्र, कंपनीच्या निवेदनानुसार, मार्च 2024 च्या तिमाहीमध्ये पेटीएमच्या विक्री विभागात जवळपास 3,500 कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. यामुळे आता एकूण कर्मचारी संख्या 36,521 इतकी राहिली आहे. कर्मचाऱ्यांची ही घट मुख्यत्वे भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेवर केलेल्या बंदीमुळे झाली आहे.
"One97 कम्युनिकेशन्स लिमिटेड (ओसीएल) कंपनीच्या पुनर्रचना प्रयत्नांचा भाग म्हणून बाहेर पडलेल्या कर्मचार्यांना मदत करत आहे," असे कंपनीने म्हटले आहे. पेटीएममधील मानव संसाधन विभाग सध्या 30 पेक्षा जास्त कंपन्यांसोबत काम करत आहे ज्या सध्या कर्मचारी भरती करत आहेत. यामुळे बाहेर पडलेल्या ज्या कर्मचार्यांनी माहिती शेअर केली आहे त्यांना मदत केली जात आहे.
"हे प्रकरण पारदर्शी आणि न्याय्य राखण्यासाठी पेटीएम कर्मचार्यांना मिळणारे बोनस देखील देत आहे," असे निवेदनात म्हटले आहे.
रिझर्व्ह बँकेने Compliance issues आणि देखरेख संबंधी चिंतांमुळे 15 मार्चपासून पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (PPBL) ला ग्राहकांच्या खात्यांमध्ये, वॉलेटमध्ये आणि फास्टॅगमध्ये रक्कम जमा करण्यावर, रोख रक्कम हस्तांतरण करण्यावर आणि टॉप-अप करण्यावर बंदी घातली होती.
या बंदीमुळे, पेटीएमने जानेवारी-मार्च 2024 च्या कालावधीत ₹550 कोटी इतके नुकसान झाल्याचे वृत्त आहे. तर गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ₹167.5 कोटी इतके नुकसान झाले होते.
"One97 कम्युनिकेशन्सने आपल्या वित्तीय वर्ष 24 च्या कमाई अहवालात म्हटले आहे की, ते त्यांचे कमी महत्वाचे व्यवसाय बंद करणार आहेत आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे अत्यल्प कर्मचारीसंख्या राखण्यासाठी प्रयत्नशील राहतील. कंपनी नफ्याकडे आग्रह दाखवत आहे," असे कंपनीने म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.