Digital Rupee Launched: आरबीआयने आज अधिकृतपणे डिजिटल रुपीला (Digital Rupee) लाँच केले आहे. गेल्याकाही वर्षात सायबर वर्ल्डमध्ये मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता आरबीआयने डिजिटल रुपीला लाँच केले आहे. सध्या हा एक पायलट प्रोजेक्ट आहे. अनेकांना डिजिटल रुपी आणि यूपीआय पेमेंट समान वाटत आहे. परंतु, या दोन्हीही गोष्टी वेगळ्या आहेत. Digital Rupee विषयी तुम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाविषयी सविस्तर जाणून घेऊया.
डिजिटल रुपी काय आहे?
डिजिटल रुपी नक्की काय आहे, ते समजून घेणे गरजेचे आहे. डिजिटल रुपी हे तुमच्या रोख रक्कमेचे डिजिटल स्वरूप आहे. म्हणजेच, तुम्ही आता ज्याप्रमाणे रोख पैसे खर्च करता, त्याप्रमाणे डिजिटल रुपी खर्च करू शकता. सध्या आरबीआयने पायलट प्रोजेक्ट स्वरुपात याची सुरुवात केली आहे.
UPI आणि डिजिटल रुपीमध्ये नक्की फरक काय?
सध्या तुम्ही जे यूपीआय पेमेंट करत आहात, ते सर्व ट्रांजॅक्शन डिजिटल स्वरुपात होत असले तरी देवाण-घेवाण ही रोखच असते. म्हणजे पद्धत फक्त डिजिटल असली तरीही पेमेंट रोखच होते. परंतु, आरबीआयने या पायलट प्रोजेक्टला पूर्णपणे लागू केल्यास रोख पैशांची जागा डिजिटल रुपी घेईल. गुगल पे आणि फोन पे द्वारे होणाऱ्या व्यवहारांपेक्षा हे पूर्णपणे वेगळे आहे.
डिजिटल रुपी खरेदी करता येईल?
डिजिटल रुपीला तुम्ही खरेदी करू शकत नाही. ही कोणतीही वस्तू अथवा क्रिप्टोकरन्सी नाही. हे एकप्रकारचे चलनच आहे. आजपर्यंत आपण कागदी व नाणी स्वरुपात असलेल्या रुपयाला कधी खरेदी केले नाही. त्याप्रमाणेच डिजिटल रुपीला खरेदी करावे लागणार नाही. भविष्यात रुपीला दुसऱ्या चलनासोबत एक्सचेंज करू शकता. टोकन आधारित डिजिटल रुपी असेल, जे तुमच्या डिजिटल वॉलेटमध्ये जमा होईल. थोडक्यात, तुम्ही डिजिटल रुपीला ट्रान्सफर करू शकता; परंतु खरेदी करू शकत नाही. बँक डिजिटल वॉलेट उपलब्ध करेल व तुम्ही यातूनच पैसे खर्च करू शकता.
Digital Rupee चे टोकन कसे मिळेल?
e₹-R डिजिटल टोकन स्वरुपात असेल. याचा उपयोग पर्सन-टू-पर्सन आणि पर्सन-टू-मर्चेंट दोन्ही व्यवहारांसाठी करू शकता. आरबीआयने या पायलट प्रोजेक्टसाठी ८ बँकांची निवड केली आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, येस बँक आणि IDFC First बँक सुरुवातीच्या टप्प्यात सहभागी होतील. त्यानंतर बँक ऑफ बडोदा, कोटक महिंद्रा बँक, यूनियन बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँका प्रोजेक्टमध्ये नंतर सहभागी होतील. सुरुवातीला ही सेवा नवी दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि भुवनेश्वर या शहरात सुरू केली जाईल.
डिजिटल रुपीचे नक्की फायदे काय?
डिजिटल रुपीचे अनेक फायदे आहेत. याद्वारे नाणी व नोटा निर्मितीसाठी लागणारा खर्च आरबीआय कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. नोटा व नाण्याच्या निर्मितीसाठी मोठा खर्च येतो व नंतर ते खराब देखील होते. नोटा व नाणी बँकांपर्यंत पोहचवण्यासाठी देखील खर्च येतो. परंतु, डिजिटल रुपीमुळे हा खर्च कमी होईल. याच्या मदतीने ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण देखील कमी होण्यास मदत होईल.
चुकीच्या व्यवहारांमुळे होणारे नुकसान देखील टाळता येईल. रुपी ब्लॉकचेन टेक्नोलॉजीवर आधारित असल्याने रक्कम चुकीच्या खात्यात जाणार नाही. थोडक्यात, डिजिटल रुपीद्वारे केलेला व्यवहार अधिक सुरक्षित आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.