Elon Musk Cage Fight : 'झुक्याशी अजूनही भांडायला तयार', इलॉन मस्कने पुन्हा वर काढला 'केज फाईट'चा विषय

Musk Vs Zuck : इलॉन मस्क आणि मार्क झुकरबर्ग हे दोघे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. गेल्या वर्षी मेटाने 'एक्स'ला टक्कर देण्यासाठी थ्रेड्स हे अ‍ॅप लाँच केलं होतं.
Elon Musk Cage Fight
Elon Musk Cage FighteSakal
Updated on

Elon Musk Vs Mark Zuckerberg Fight : मागील वर्षी इलॉन मस्क आणि मार्क झुकरबर्ग यांच्यातील 'केज फाईट'चा मुद्दा बराच गाजला होता. सोशल मीडियावर गमतीत सुरू झालेल्या मुद्द्यावरुन हे दोघे टेक जायंट खरोखरच एकमेकांविरोधात रिंगणात उतरण्यास सज्ज झाले होते. मात्र, काही कारणाने ही लढाई होऊ शकली नाही. आता इलॉन मस्कने पुन्हा एकदा या लढाईचा मुद्दा वर काढला आहे.

एका एक्स (ट्विटर) पोस्टला रिप्लाय देताना इलॉन मस्कने (Elon Musk) हा विषय पुढे आणला. "कोलेसियम पाहिल्यानंतर मी टूर गाईडला इलॉन विरुद्ध झुकरबर्ग फाईटविषयी विचारलं. त्यावर तो हसला आणि म्हणाला की ही फाईट पहायला आम्हाला नक्कीच आवडेल." अशा आशयाच्या पोस्टवर इलॉनने "मी झुकरबर्गसोबत कधीही, कुठेही आणि कोणत्याही नियमांनुसार लढाईला तयार आहे" असा रिप्लाय दिला आहे.

दोघांमधून जात नाही विस्तव

इलॉन मस्क आणि मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) हे दोघे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. गेल्या वर्षी मेटाने 'एक्स'ला टक्कर देण्यासाठी थ्रेड्स हे अ‍ॅप लाँच केलं होतं. यावर झुकरबर्ग आपली कॉपी करत असून, त्याने एक्सचे माजी कर्मचारी चोरले असल्याचा आरोप इलॉन मस्कने केला होता. यानंतर या दोघांमधील तणाव वाढला होता.

Elon Musk Cage Fight
Facebook Down : फेसबुक-इन्स्टा अन् यूट्यूबही डाऊन, मस्कसोबत सगळ्यांनीच केलं मेटाला ट्रोल.. काल रात्री काय काय घडलं?

दोन दिवसांपूर्वीच जेव्हा मेटाच्या सर्व सेवा ठप्प झाल्या होत्या, तेव्हा इलॉन मस्कने एक मीम शेअर करत मेटाला ट्रोल केलं होतं. यानंतर आता त्याने लढाईचा मुद्दा उकरून काढला आहे. यावर आता झुकरबर्ग काय प्रतिक्रिया देतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Musk Vs Zuck)

लढाईची झाली होती तयारी

या दोघांनीही सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून एकमेकांना लढाईचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर इलॉन मस्कने बॉक्सिंगची (Musk-Zuckerberg Cage Fight) तयारी सुरू केली होती. तर झुकरबर्गने मिक्स्ड मार्शल आर्ट्सची तयारी सुरू केली होती. मात्र पुढे या दोघांमध्ये लढाईच्या जागेवरुन काही वाद झाला आणि ही केज फाईट झालीच नाही. दोघांनीही समोरच्याने माघार घेतल्याचा आरोप एकमेकांवर केला होता.

Elon Musk Cage Fight
Starlink Satellite Crash : इलॉन मस्क पृथ्वीवर पाडणार तब्बल 100 उपग्रह; वातावरणावर काय होणार परिणाम?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.