Realme Smartphone: किंमत कमी फीचर्स दमदार! १०८MP कॅमेऱ्यासह रियलमीचे धमाकेदार स्मार्टफोन लाँच, पाहा डिटेल्स

रियलमीने आपली नवीन स्मार्टफोन सीरिज 10 pro ला लाँच केले आहे. या फोनची किंमत २५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे.
Realme
RealmeSakal
Updated on

Realme 10 pro Series Launched: स्मार्टफोन ब्रँड रियलमीने आपली नवीन स्मार्टफोन सीरिज Realme 10 pro ला लाँच केले आहे. या अंतर्गत कंपनीने रियलमी १० प्रो आणि रियलमी १० प्रो प्ल स्मार्टफोन्सला लाँच केले आहे. हे दोन्ही फोन्स १०८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेऱ्यासह येतात. फोनमध्ये शानदार डिस्प्ले, पॉवरफुल प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. Realme 10 pro स्मार्टफोनच्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा- Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

Realme 10 सीरिजची किंमत

रियलमी १० प्रो स्मार्टफोन डार्क मॅटर, हायपर स्पेस आणि नेब्यूला ब्लू रंगात येतो. फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १८,९९९ रुपये, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १९,९९९ रुपये आहे. रियलमी १० प्रो प्लसच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २४,९९९ रुपये, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २५,९९९ रुपये आहे. फोन्सला १४ डिसेंबरपासून खरेदी करू शकता.

Realme 10 Pro Plus चे स्पेसिफिकेशन

Realme 10 Pro Plus मध्ये ६.७ इंच फुल एचडी प्लस ओलेड कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. कंपनीचा दावा आहे की, या कर्व्ड डिस्प्लेसह येणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये आतापर्यंतचा सर्वात पातळ बेझल देण्यात आले आहे. डिस्प्ले बिल्ट-इन आय प्रोटेक्शन आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरसह येतो.

फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी १०८० प्रोसेसरसह माली-जी६८ जीपीयूचा सपोर्ट मिळतो. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला असून, यात १०८ मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल कॅमेऱ्याचा समावेश आहे. तर सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. पॉवर बॅकअपसाठी ६७ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल.

Realme
Google Searches: भारतीयांचा नादच खुळा! Sex on the beach ते ब्रम्हास्त्र... २०२२ मध्ये 'हे' टॉपिक्स केले सर्वाधिक सर्च

Realme 10 Pro चो स्पेसिफिकेशन्स

Realme 10 Pro स्मार्टफोन अँड्राइड १३ आधारित रियलमी यूआय ४.० वर काम करतो. फोनमध्ये ६.७ इंच फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन २४००x१०८० पिक्सल आणि रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. फोनमध्ये क्वाड-कोर स्नॅपड्रॅगन ६९५ ५जी प्रोसेसरसह ८ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत UFS २.२ स्टोरेजचा सपोर्ट मिळतो. फोनमधील रॅमला १६ जीबीपर्यंत वाढवू शकता.

फोनमध्ये ड्यूल कॅमेरा सेटअप दिला असून, यात १०८ मेगापिक्सल मुख्य कॅमेरा आणि २ मेगापिक्सल सेकेंडरी कॅमेरा दिला आहे. तर फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. पॉवर बॅकअपसाठी ३३ वॉट सूपरवूक फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की अवघ्या २९ मिनिटात फोन ५० टक्के चार्ज होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.