Realme 11 Pro 5G : प्री-ऑर्डर करता येईल रिअलमीचा नवीन स्मार्टफोन; पाहा फीचर्स, किंमत आणि ऑफर्स

हे फोन 15 आणि 16 जूनपासून विक्रीसाठी उपलब्ध होतील.
Realme 11 Pro 5G : प्री-ऑर्डर करता येईल रिअलमीचा नवीन स्मार्टफोन; पाहा फीचर्स, किंमत आणि ऑफर्स
Updated on

Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ हे फोन अनुकमे 15 आणि 16 जूनपासून विक्रीसाठी उपलब्ध होतील. मात्र, फ्लिपकार्टवर तुम्ही आताच हा फोन प्रीऑर्डर करु शकणार आहात. यासोबतच, या फोनवर तुम्हाला मोठा डिस्काउंटही देण्यात येत आहे.

किती आहे किंमत?

Realme 11 Pro या फोनचं बेस मॉडेल 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजसह येतं. याची किंमत 23,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 8GB+256GB व्हेरियंटची किंमत 24,999 रुपये आहे. Realme 11 Pro च्या टॉप व्हेरियंटमध्ये 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज देण्यात आलंय. याची किंमत 27,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

Realme 11 Pro 5G : प्री-ऑर्डर करता येईल रिअलमीचा नवीन स्मार्टफोन; पाहा फीचर्स, किंमत आणि ऑफर्स
Mobile Tips : मोबाईल वापरत वापरत जपा डोळ्यांचं आरोग्य, पाहा टिप्स

Realme 11 Pro+ या फोनच्या बेस मॉडेलची किंमत 27,999 रुपये असणार आहे. यामध्ये 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज देण्यात आलं आहे. तर याच्या टॉप मॉडेलमध्ये 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज देण्यात आलंय. याची किंमत 29,999 रुपये आहे.

अशा आहेत ऑफर्स

फ्लिपकार्टवर हा फोन खरेदी करताना बँक ऑफर्स देण्यात येत आहेत. अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करून प्रीऑर्डर केल्यास या फोनवर तुम्हाला 5 टक्के डिस्काउंट मिळणार आहे. यासोबतच तुमचा जुना फोन एक्सचेंज करूनही तुम्ही यावर मोठा डिस्काउंट मिळवू शकता. तुमचा जुना फोन कोणता आहे, तसेच तो किती वापरला आहे यानुसार तुम्हाला मिळणारा डिस्काउंट ठरेल.

काय आहेत फीचर्स

Realme 11 Pro+ या स्मार्टफोनमध्ये 200 मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर, 11 Pro या मॉडेलमध्ये 100 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी Realme 11 Pro फोनमध्ये 16 MP क्षमतेचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर, 11 Pro+ फोनमध्ये 32 MP क्षमतेचा कॅमेरा दिला आहे.

Realme 11 Pro 5G : प्री-ऑर्डर करता येईल रिअलमीचा नवीन स्मार्टफोन; पाहा फीचर्स, किंमत आणि ऑफर्स
Mobile Vibration : खिशात मोबाईल व्हायब्रेट होत असल्याचा होतोय भास? गंभीर आजाराचं आहे लक्षण

सॉफ्टवेअर आणि डिस्प्ले

या दोन्ही फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7050 SoC प्रोसेसर देण्यात आलाय. तसंच, दोन्ही फोन अँड्रॉईड 13 या OS वर चालतील. या दोन्ही फोनमध्ये 6.7 इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आलाय. तसंच, दोन्ही फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असणार आहे.

बॅटरी आणि चार्जिंग

या दोन्ही फोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. 11 Pro हा 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो, तर 11 Pro+ हा 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

Realme 11 Pro 5G : प्री-ऑर्डर करता येईल रिअलमीचा नवीन स्मार्टफोन; पाहा फीचर्स, किंमत आणि ऑफर्स
20k Budget Smartphone : 20 हजारांच्या बजेटमध्ये हवाय चांगला स्मार्टफोन... हे आहेत काही ऑप्शन, लगेच पाहा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.