स्मार्टफोन ब्रँड Realme ने आपला नवीन 5G फोन Realme 9i 5G भारतात लॉन्च केला आहे. कंपनीने हा फोन बजेट सेगमेंटमध्ये सादर केला आहे. फोनमध्ये 6.6-इंचाच्या डिस्प्लेसह MediaTek Dimensity 810 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 6 GB पर्यंत रॅम आणि 128 GB पर्यंत स्टोरेज असून RAM देखील वाढवता येते. Realme 9i 5G मध्ये 50-megapixel रियर कॅमेरा सेटअपसह 5,000mAh बॅटरी दिली आहे. चला जाणून घेऊया या फोनची किंमत, स्पेसिफिकेशन आणि फीचर्स...
Realme 9i 5G ची किंमत
हा फोन मेटॅलिक गोल्ड, रॉकिंग ब्लॅक आणि सोलफुल ब्लू कलरमध्ये सादर करण्यात आला आहे. Realme 9i 5G च्या 4 GB रॅमसह 64 GB स्टोरेज 13,999 रुपयांना आणि 128 GB स्टोरेजसह 6 GB 15,999 रुपयांना लॉन्च करण्यात आले आहे. 24 ऑगस्टपासून हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल.
Realme 9i 5G चे स्पेसिफिकेशन्स
Realme 9i 5G हा स्मार्टफोन Android 12 आधारित UI 3.0 सह येतो. यात तुम्हाला 6.6-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले दिला आहे, जो 90Hz रिफ्रेश रेट, (1,080x2,400 पिक्सेल) रिझोल्यूशन आणि 400 nits ब्राइटनेससह येतो. फोनमध्ये Octa-core MediaTek Dimensity 810 प्रोसेसर आणि 6 GB पर्यंत LPDDR4X रॅम आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने फोनचे स्टोरेजही वाढवता येते.
Realme 9i 5G चा कॅमेरा
फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, जो f/1.8 अपर्चरसह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे आणि प्रत्येकी एक डेप्थ आणि मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे, जो f/2.0 अपर्चरसह येतो.
Realme 9i 5G ची बॅटरी
फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंगसह येते. तसेच फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth v5.2, GPS/AGPS आणि USB Type-C पोर्ट उपलब्ध आहेत. यासोबतच फोनमध्ये सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेन्सरही उपलब्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.