Realme P1 Speed ​​5G लाँच; कमी किमतीचा दमदार स्मार्टफोन,काय आहेत खास फीचर्स अन् किंमत किती? पाहा एका क्लिकमध्ये..

realme p1 Speed 5G Smartphone : Realme ने त्यांचा नवीन P1 Speed 5G स्मार्टफोन लाँच केला आहे.
realme p1 5G launched in india price features
realme p1 5G Smartphone price featuresesakal
Updated on

realme p1 5G Smartphone price features : भारताच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये Realme ने त्यांचा नवीन P1 Speed 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन खासकरून गेमिंगसाठी उत्कृष्ट पर्याय आहे. यात स्टेनलेस स्टील व्हीसी कूलिंग सिस्टीम, GT मोड आणि लेग-फ्री गेमिंगचा अनुभव देणारे आहे. या वैशिष्ट्यांमुळे गेमिंगप्रेमींसाठी हा पसंतीचा स्मार्टफोन ठरणार आहे.

Realme P1 Speed 5G चे मुख्य वैशिष्ट्ये

Realme P1 Speed 5G मध्ये 4nm MediaTek Dimensity 7300 Energy प्रोसेसर दिला असून, 12GB LPDDR4X रॅम आणि 256GB UFS 3.1 स्टोरेजसह येतो. स्मार्टफोन Android 14 आधारित Realme UI 5.0 वर चालतो. Dynamic RAM फीचरमुळे यातील उपलब्ध रॅम 26GB पर्यंत वाढवता येते. तापमान नियंत्रणासाठी यामध्ये 6,050mm इतके स्टील व्हीसी कूलिंग सिस्टम दिले आहे.

स्मार्टफोनमध्ये 6.67-इंच फुल HD+ डिस्प्ले असून, 1,080x2,400 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. स्क्रीनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 92.65% असून, 2,000nits पीक ब्राइटनेस आहे. शिवाय, यामध्ये 'Rainwater Smart Touch' नावाचे विशेष फीचर आहे, ज्यामुळे स्क्रीनचा अनुभव अधिक सहज होतो.

realme p1 5G launched in india price features
Bumper Discount On Samsung Galaxy S24 : खुशखबर! Samsung Galaxy S24 स्मार्टफोन चक्क ३० हजारात; दिवाळी ऑफरमध्ये इथे मिळतोय जबरदस्त डिस्काउंट

कॅमेरा आणि बॅटरी

Realme P1 Speed 5G मध्ये 50-मेगापिक्सलचा AI कॅमेरा दिला असून, उच्च दर्जाचे फोटो आणि व्हिडिओ शूटिंगसाठी उपयुक्त आहे. तसेच, सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. 5,000mAh क्षमतेची बॅटरी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, त्यामुळे लांब वेळेसाठी बॅटरी टिकते.

कनेक्टिव्हिटी आणि सेन्सर्स Realme P1 Speed 5G मध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth 5.4, GPS, Glonass, Beidou यांसारखे आधुनिक कनेक्टिव्हिटी पर्याय दिले आहेत. स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, एक्सलरेशन सेन्सर, जायरोस्कोप आणि IP65 धूळ व पाण्यापासून संरक्षण रेटिंग दिली आहे.

realme p1 5G launched in india price features
WhatsApp VC Feature : व्हिडिओ कॉलिंगसाठी व्हॉट्सॲपने आणलं नवं फीचर; कसं सुरू कराल लो-लाइट मोड? काय आहे फायदा,जाणून घ्या

किंमत आणि उपलब्धता

Realme P1 Speed 5G दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. त्यामध्ये ब्रश्ड ब्लू आणि टेक्स्चर्ड टायटॅनियम असे दोन रंग आहेत. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला बेस मॉडेलची किंमत 17,999 रुपये आहे, तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या हाय एंड मॉडेलची किंमत 20,999 रुपये आहे. मात्र, मर्यादित काळासाठी ग्राहकांना 2,000 रुपये कूपन डिस्काउंट मिळू शकतो, ज्यामुळे बेस मॉडेलची किंमत 15,999 रुपये आणि हाय एंड मॉडेलची किंमत 18,999 रुपये होईल.

Realme P1 Speed 5G ची विक्री 20 ऑक्टोबरपासून Realme.com आणि Flipkart वर सुरू होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.