Red Planet Day: रेड प्लॅनेट डे निमित्त वाचा मंगळावरच्या पहिल्या खुनाची कहाणी

त्यांच्या 228 दिवसांच्या मोहिमेने 14 जुलै 1965 रोजी मंगळाच्या 6,118 मैलांच्या आत अंतराळयान नेले होते आणि मंगळाचे सर्वात जवळचे फोटो पाठवले होते.
Red Planet Day
Red Planet Daygoogle
Updated on

मुंबई : प्रत्येक 28 नोव्हेंबर हा “रेड प्लॅनेट डे” म्हणून साजरा केला जातो. 28 नोव्हेंबर 1964 रोजी स्पेसक्राफ्ट मरिनर 4 च्या लॉन्चिंग ची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. त्यांच्या 228 दिवसांच्या मोहिमेने 14 जुलै 1965 रोजी मंगळाच्या 6,118 मैलांच्या आत अंतराळयान नेले होते आणि मंगळाचे सर्वात जवळचे फोटो पाठवले होते.

Red Planet Day
Rocket : खासगी कंपनीने तयार केलेले पहिले भारतीय रॉकेट घेणार भरारी

मंगळावरची अनेक माहिती आपण वाचली असेल, पण त्यावरती एक साय फाय पुस्तक लिहिलं आहे हे तुम्हाला माहिती आहे का ?

मार्क सेबल यांनी लिहिलेली आफ्टरशॉक कॉमिक्सची नवीन हायब्रीड साय-फाय/वेस्टर्न सिरीज "फिअर ऑफ अ रेड प्लॅनेट" ही एक थ्रिलर गोष्ट आहे. मंगळ ग्रहावरील पहिली वास्तविक हत्या याविषयी हे पुस्तक आहे.

ही कथा एका कायद्याचं पालन करणाऱ्या आणि आपल्या पृथ्वीवरच्या भूतकाळापासून दूर पाळणाऱ्या एका महिलेची आहे. आजपासून 50 वर्षांनंतर मार्स अर्थात मंगळा वरती रहिवासी कॉलनी असेलच; पण लोकांच्या क्रूरतेने भरलेलीही असू शकते.

Red Planet Day
प्लुटोला ग्रह मानणे ही शास्त्रज्ञांची चूक ठरली, कारण...

पुस्तक या महिलेच्या एका शोधाची गोष्ट सांगत. ती तिथे एकही गोळी न झाडलेली स्त्री आहे आणि तिच्या कॉलनी मधल्या एका रहिवाशाच्या खुनाची गोष्ट तिला शोधायला सांगितलं जातं आणि तो माणूस त्या कॉलनी मधला खूप क्रूर माणूस आहे. पूर्ण कथा याच कथानका भोवती फिरते.

आज मंगळावर जीव सृष्टी आहे का हेही अजून माहिती नसतांना लेखकाने तिने माणूस राहतो आहे आणि एक मर्डर होतो आहे अशी एक सुंदर कल्पना मांडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.