Reddit-Microsoft Dispute : इंटरनेटवर माहिती मिळवण्यासाठी मोजावे लागणार पैसे? रेडिटने मायक्रोसॉफ्टच्या 'या' सेवा केल्या बंद,नेमकं प्रकरण काय?

Reddit - Microsoft Problems : रेडिटचे सीईओ स्टीव्ह हफमन यांनी रेडिटवरील माहिती मोफतपणे वापरण्यावर बंदी घालण्याची धक्कादायक घोषणा केली आहे.
Reddit CEO Insists on Payment for Data from Microsoft and Others
Reddit CEO Insists on Payment for Data from Microsoft and Othersesakal
Updated on

Reddit-Microsoft data scraping dispute : इंटरनेटवरवर मोफत मिळणाऱ्या माहितीच्या युगाचा आता खरचं काय अंत होणार आहे का? असा प्रश्न उपस्थित करणारी बातमी समोर आली आहे. रेडिटचे सीईओ स्टीव्ह हफमन यांनी रेडिटवरील माहिती मोफतपणे वापरण्यावर बंदी घालण्याची धक्कादायक घोषणा केली आहे.

रेडिटवर असलेल्या माहितीचा वापर करायचा असेल तर आता कंपन्यांना त्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत. विशेष म्हणजे, गुगल आणि ओपनएआय यांच्यासोबत करार झाल्यानंतर हफमन यांनी मायक्रोसॉफ्टसह इतर कंपन्यांना हा थेट इशारा दिला आहे.

मायक्रोसॉफ्ट, अॅन्थ्रोपिक आणि पर्प्लेक्सिटी या कंपन्यांनी रेडिटशी करार करण्यास नकार दिल्यामुळे त्यांना ब्लॉक करणे आम्हाला खूप त्रासदायक वाटते, असेही हफमन म्हणाले. रेडिटने बेकायदा वेब क्रॉलर्सवर कारवाई सुरू केली आहे आणि ज्या कंपन्यांशी करार नाही अशा कंपन्यांचा प्रवेश रोखण्यासाठी त्यांच्या रोबोट्स.टक्स्ट फाईलमध्येही जुलै महिन्यात सुधार केला आहे.

Reddit CEO Insists on Payment for Data from Microsoft and Others
Microsoft Bing AI : मायक्रोसॉफ्ट बिंगमध्ये आलंय अ‍ॅडवांस्ड एआय; गुगलला टक्कर देणार!

या पाऊलाचा परिणाम आता दिसून येऊ लागला आहे. गुगल सोबत झालेल्या करारामुळे रेडिटचे रिझल्ट आता फक्त गुगल सर्चमध्येच दिसून येत आहेत. मात्र, मायक्रोसॉफ्टच्या बिंग सर्च इंजिनवर रेडिटच्या माहितीचा वापर परवानगीशिवाय केला जातो, त्यांना एआय प्रशिक्षित केले जाते आणि त्यांच्या माहितीचा सारांशही परवानगीशिवाय दिला जातो, असा आरोप केला जात आहे.

सार्वजनिक इंटरनेटवरील माहिती "फ्रीवेअर" असल्याचे मायक्रोसॉफ्ट एआयचे सीईओ मुस्तफा सुलेमान यांचे म्हणणे आहे. यावर हफमन यांनी संताप व्यक्त करत माहितीचा वापर करणाऱ्या कंपन्यांनी योग्य मोबदला द्यावा अशी रेडिटची भूमिका स्पष्ट केली आहे.

Reddit CEO Insists on Payment for Data from Microsoft and Others
Microsoft Crash Refund : मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या भीषण आउटेजमुळे क्राउडस्ट्राइक वापरकर्त्यांना फटका! रिफंड मिळणार की नाही? काय आहे कंपनीची पॉलिसी

डेटा वापर आणि त्याच्या डिकमिशनिंगवरून डेटा पुरवठादार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांमध्ये वाढता तणाव या बातमीतून अधोरेखित झाला आहे. कडक नियंत्रण राबवून रेडिट त्यांची माहिती कशी वापरली जाते आणि कशी दाखवली जाते यावर आपला हक्क राखण्याचा प्रयत्न करत आहे. एआय आणि मशीन लर्निंगच्या युगात डेटाचे महत्व वाढत असताना ऑनलाईन प्लॅटफॉर्म त्यांच्या माहितीचे अधिक प्रभावीपणे डिकमिशनिंग करण्याचा एक भाग आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.