50 मेगापिक्सल कॅमेरा अन् 90Hz डिस्प्लेसह रेडमी 10 2022 लाँच

Redmi 10 2022 launched with mediatek helio g88 soc 50mp camera check all specifications here
Redmi 10 2022 launched with mediatek helio g88 soc 50mp camera check all specifications here
Updated on

रेडमी कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Redmi 10 चा 2022 एडिशन Redmi 10 2022 म्हणून लॉन्च केला आहे. कंपनीच्या ब्लॉगवरून Redmi 10 2022 लाँच झाल्याची माहिती देण्यात आली आहे, मात्र सध्या किंमत आणि उपलब्धतेबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. Redmi 10 2022 मध्ये तुम्हाला MediaTek Helio G88 प्रोसेसर देण्यात आला आहे. याशिवाय यात 4 जीबीपर्यंतची रॅम देण्यात आली आहे. नवीन फोनचे फीचर्स आधीच बाजारात असलेल्या Redmi 10 सारखेच आहेत. Redmi 10 2022 कार्बन ग्रे, पेबल व्हाइट आणि सी ब्लू रंगांमध्ये उपलब्ध असेल.

Redmi 10 गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मलेशियामध्ये लॉन्च करण्यात आला होता. Redmi 10 तीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला. मलेशियामध्ये, Redmi 10 च्या 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेजची किंमत $ 179 म्हणजेच सुमारे 13,300 रुपये होती.

Redmi 10 2022 चे स्पेसिफिकेशन:

Redmi 10 मध्ये Android 11 आधारित MIUI 12.5 देण्यात आला आहे. याशिवाय, फोनमध्ये 6.5-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1080x2400 पिक्सेल आहे. डिस्प्ले AdaptiveSync आहे आणि त्याचा रिफ्रेश दर 90Hz आहे. डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लास 3 संरक्षण असून फोनमध्ये मोड 3.0 आणि सनलाइट डिस्प्लेसाठी सपोर्ट करतो. यात MediaTek Helio G88 प्रोसेसर, 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज आहे.

Redmi 10 2022 launched with mediatek helio g88 soc 50mp camera check all specifications here
Infinix Zero 5G फोन भारतात लॉंच; तुमच्या बजेटमध्ये बसेल किंमत

Redmi 10 चा कॅमेरा

च्या कॅमेर्‍याबद्दल बोलायचे तर फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले गेले आहेत, ज्यामध्ये प्राइमरी लेन्स 50 मेगापिक्सेल आहे. दुसरी लेन्स 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड आहे, तिसरी लेन्स 2 मेगापिक्सेल मॅक्रो आणि चौथी 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Redmi 10 2022 launched with mediatek helio g88 soc 50mp camera check all specifications here
फ्लिपकार्टचा Sell Back प्रोग्राम; जुना स्मार्टफोन विका बेस्ट किंमतीत

redmi 10 बॅटरी

फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि AI फेस अनलॉक देखील आहे. यात 5000mAh बॅटरी आहे जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनसोबत बॉक्समध्ये 22.5W चा चार्जर उपलब्ध असेल. कनेक्टिव्हिटीसाठी, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक आहे.

Redmi 10 2022 launched with mediatek helio g88 soc 50mp camera check all specifications here
Maruti घेऊन येतेय पहिली इलेक्ट्रिक कार; किती असेल किंमत? वाचा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()