रेडमीचा स्वस्त स्मार्टफोन लॉंच; मिळेल 50MP कॅमेरा, फास्ट चार्जिंग

redmi 10 launched in india with 50mp dual camera price under 11 thousand check details
redmi 10 launched in india with 50mp dual camera price under 11 thousand check details
Updated on

Redmi ने आज भारतात त्यांचा Redmi 10 हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. नवीन बजेट रेडमी स्मार्टफोनची खासियत म्हणजे, त्यात असलेला स्नॅपड्रॅगन 680 आणि 50MP कॅमेरा. कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन रेडमी 9 चा उत्तराधिकारी आहे जो 2020 मध्ये आला होता. हे नवीन डिझाइन आणि अधिक चांगल्या फीचर्ससह हे मॉडल देण्यात आले आहे. चला जाणून घेऊया या फोनचे सर्व फीचर्स आणि किंमत..

Redmi 10 किंमत आणि ऑफर

Redmi 10 च्या 4GB / 64GB व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे आणि 6GB / 128GB व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे. जे खरेदीदार एचडीएफसी क्रेडिट कार्ड किंवा ईएमआय स्कीममध्ये हा फोन खरेदी करतात त्यांना 1000 रुपयांची सूट मिळेल. Redmi 10 Mi.com, Flipkart.com, Mi Home आणि Mi Studio स्टोअर्सवर 24 मार्च दुपारी 12 वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. Redmi चा हा फोन कॅरिबियन ग्रीन, पॅसिफिक ब्लू आणि मिडनाईट ब्लॅक या तीन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

redmi 10 launched in india with 50mp dual camera price under 11 thousand check details
भारताने रशियाकडून खरेदी केलं 30 लाख बॅरल कच्चं तेल; मिळाली 'इतकी' सूट

Redmi 10 चे स्पेसिफिकेशन

Redmi 10 मध्ये 6.71-इंचाचा HD डिस्प्ले आहे. मात्र, डिस्प्लेला Widevine L1 सर्टिफिकेशन मिळाले आहे. Redmi ने सांगितले आहे की, डिस्प्लेमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लासचे संरक्षण दिले जात आहे. फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 SoC सह LPDDR4x RAM आणि UFS 2.2 स्टोरेज सपोर्टसह दिला आहे. हा फोन Android 11 वर आधारित MIUI 13 बूट करतो. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी, हँडसेटच्या मागील बाजूस ड्युअल-कॅमेरा आहे ज्यामध्ये 50MP प्राथमिक सेन्सर आणि 2MP डेप्थ सेन्सर दिला आहे. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी समोर 5MP शूटर आहे.

redmi 10 launched in india with 50mp dual camera price under 11 thousand check details
TVS चे आणखी एक स्वस्त स्कूटर लॉंच; जाणून घ्या किंमतीसह सर्वकाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.