Redmi 10 Vs Realme 9i : दोन्हीत बेस्ट स्मार्टफोन कोणता? जाणून घ्या

redmi 10 vs realme 9i which is best smartphone check comparision in price performance and specification
redmi 10 vs realme 9i which is best smartphone check comparision in price performance and specification
Updated on

Realme आणि Redmi ब्रँड स्मार्टफोन्समध्ये बाजारात जबरदस्त स्पर्धा आहे. दोघेही बजेट स्मार्टफोनमध्ये बेस्ट स्मार्टफोन ऑफर करण्यासाठी ओळखले जातात. पण किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत कोणता स्मार्टफोन चांगला आहे? या प्रश्नाचे उत्तर आज आपण पाहाणार आहोत

किंमत किती आहे?

Redmi 10 या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट फोनची किंमत रु 10,999 इतकी आहे तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट तुम्हाला 12,999 रुपयांना खरेदी करता येईल.

realme 9i या स्मार्टफोनच्या किंमती तुलनेने थोड्या जास्त आहेत. तुम्हाला 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट 12,999 रुपये आणि 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 15,999 रुपयांना मिळेल.

Redmi 10 स्मार्टफोन किंमतीच्या बाबतीत खूपच चांगला आहे. Realme 9i स्मार्टफोनच्या 6 GB आणि 4 GB रॅम व्हेरिएंटची किंमत Redmi 10 पेक्षा सुमारे 2000 ते 3000 रुपये जास्त आहे. अशा परिस्थितीत, स्वस्त स्मार्टफोनच्या बाबतीत, Redmi 10 चांगला ऑप्शन ठरतो

डिझाईन आणि डिस्प्ले

Redmi 10 च्या मागील बाजूस प्लास्टिक कव्हर देण्यात आले आहे. फिंगरप्रिंट सेन्सर त्याच्या मागच्या बाजूलाच आहे. तर Realme 9i चा मागील पॅनल खूप चांगला आहे. पण फोन पंच-होल कटआउटसह येतो. तर Redmi 10 वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले सह येतो. जे चांगले दिसते. तुम्हाला Redmi 10 मध्ये 1600 x 720 पिक्सेलच्या स्क्रीन रिझोल्यूशनसह 6.71-इंचाचा HD+ IPS डिस्प्ले दिला आहे. त्याचा रिफ्रेश दर 60Hz आहे. पीक ब्राइटनेस 400nits आहे, तर Realme 9i हा 2400 x 1080 पिक्सेलच्या स्क्रीन रिझोल्यूशनसह 6.6-इंच फुल HD+ LCD डिस्प्ले देण्यात येतो. फोन 90Hz स्क्रीन रिफ्रेश रेटसह येतो आणि यामध्ये तुम्हाला पीक ब्राइटनेस 480 nits दिली आहे. अशा परिस्थितीत, Realme 9i डिस्प्लेच्या बाबतीत अव्वल ठरतो

redmi 10 vs realme 9i which is best smartphone check comparision in price performance and specification
15 हजारांत बेस्ट स्मार्टफोन; मिळेल 50MP कॅमेरा अन् 5000mAh बॅटरी

परफॉर्मंस

Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर Redmi 10 आणि Realme 9i या दोन्ही स्मार्टफोनमध्ये देण्यात आला आहे. Redmi 10 MIUI 13 वर आणि Realme 9i हा Realme UI 2.0 वर चालतो. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये Android 11 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. Realme 9i स्मार्टफोनमध्ये 5GB व्हर्चुअल रॅम सपोर्ट देण्यात आला आहे.

कॅमेरा

Redmi 10 मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा 50MP आहे. याशिवाय 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी 5MP लेन्स देण्यात आली आहे. Realme 9i स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. त्याचा प्राथमिक कॅमेरा 50MP आहे. याशिवाय 2MP B&W पोर्ट्रेट लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी फोनमध्ये 16MP कॅमेरा आहे.

redmi 10 vs realme 9i which is best smartphone check comparision in price performance and specification
सॅमसंगचा Galaxy A53 5G फोन भारतात लॉन्च; प्री-बुकिंगवर मिळतेय ऑफर

बॅटरी

Redmi 10 मध्ये 6,000mAh बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Realme 9i स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. जर आपण बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झाले तर Redmi 10 स्मार्टफोन अधिक चांगला आहे.

कोणता स्मार्टफोन आहे बेस्ट

Redmi 10 आणि Realme 9i कार्यक्षमतेत जवळजवळ एकसारखे आहेत. मात्र, कॅमेराच्या बाबतीत, Realme 9i, तर बॅटरी आणि बजेटच्या बाबतीत, Redmi 10 दमदार ठरत आहे. त्याच वेळी, दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 5 जीबी व्हर्च्युअल रॅम सपोर्टचा फरक दिसून येतो. अशा परिस्थितीत ग्राहक त्यांच्या बजेटनुसार दोनपैकी एक स्मार्टफोन निवडू शकतात.

redmi 10 vs realme 9i which is best smartphone check comparision in price performance and specification
TVS चे आणखी एक स्वस्त स्कूटर लॉंच; जाणून घ्या किंमतीसह सर्वकाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()