बजेट स्मार्टफोन सेगमेंटमध्ये आज दोन मोठ्या ब्रँडचे फोन लाँच होणार आहेत. श्याओमी आणि मोटोरोला या कंपन्या आज आपले नवीन फोन भारतात उपलब्ध करतील. या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये तुम्हाला तगडे फीचर्स मिळणार आहेत.
या दोन्ही स्मार्टफोनपैकी श्याओमीच्या Redmi 12 5G या फोनची सध्या सर्वात जास्त चर्चा सुरू आहे. या दोन्ही फोनमध्ये काय फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स असणार आहेत, याबाबत आधीच माहिती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला स्मार्टफोन हवा असल्यास, तुमच्या पसंतीनुसार दोन्हीपैकी एका फोनची निवड करू शकता.
रेडमी 12 5जी या स्मार्टफोनमध्ये 6.79 इंच मोठी स्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. या फोनमध्ये Snapdragon 4 Gen 2 हा प्रोसेसर दिला आहे. तर यामध्ये अँड्रॉईड 13 आधारित MIUI 14 ही ओएल असणार आहे. (Smartphones Launching Today)
या फोनमध्ये मागच्या बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यातील प्रायमरी कॅमेरा 50 MP क्षमतेचा आहे. यातील बॅटरी 5000 mAh क्षमतेची असेल, जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हा फोन 5G सोबतच 4G व्हेरियंटमध्येही उपलब्ध केला जाईल.
रेडमी 12 च्या 5G व्हेरियंटमध्ये 6GB+128GB आणि 8GB+256GB असे दोन ऑप्शन मिळतील. तर 4G व्हेरियंटमध्ये 4GB+128GB आणि 6GB+128GB असे दोन ऑप्शन मिळतील.
मोटोरोलाच्या या फोनमध्ये 6.5 इंच फुल HD+ डिस्प्ले देण्यात येईल. तसंच, यामध्ये T616 SOC चिपसेट असणारा प्रोसेसर देण्यात आला आहे. रेडमीप्रमाणे यातही प्रायमरी कॅमेरा 50 MP आहे, मात्र यात ड्युअल कॅमेरा सेटअप असेल.
या फोनमध्येही 5000 mAH क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. मोटो G14 हा फोन केवळ 4GB+128GB या ऑप्शनसह उपलब्ध करण्यात येईल. या स्मार्टफोनला IP52 रेटिंग मिळाली आहे.
हे दोन्ही स्मार्टफोन 10 ते 12 हजार रुपयांदरम्यान उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बजेट स्मार्टफोन सेगमेंटमध्ये यात मोठी स्पर्धा पहायला मिळणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.