Redmi ने लॉन्च केला स्वस्त स्मार्टफोन! मिळतो 50MP कॅमेरा अन् 5000mAh बॅटरी

redmi 12c launched with mediatek helio g85 soc 50mp camera price and specifications
redmi 12c launched with mediatek helio g85 soc 50mp camera price and specifications
Updated on

Redmi ने आपला नवीन फोन Redmi 12C देशांतर्गत बाजारात लॉन्च केला आहे. Redmi 12C लाँच झाल्यानंतर कंपनीच्या नवीन फ्लॅगशिप Redmi K60 सीरीजची विक्री देखील सुरू झाली आहे. Redmi 12C हा Redmi 10C ची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे. Redmi 12C मध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे. याशिवाय Redmi ने हा फोन तीन स्टोरेज व्हेरिएंट आणि चार कलर व्हेरियंटमध्ये लॉन्च केला आहे. Redmi 12C मध्ये प्लास्टिकची बॉडी आणि फ्रेम आहे.

Redmi 12C ची किंमत

Redmi 12C ची किंमत 699 चीनी युआन म्हणजेच सुमारे 8,400 रुपये आहे. या किंमतीत, 4 GB रॅमसह 64 GB स्टोरेज उपलब्ध असेल. याशिवाय फोनच्या 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजची किंमत 799 चीनी युआन म्हणजेच जवळपास 9,600 रुपये ठेवण्यात आली आहे. फोनच्या टॉप व्हेरिएंटची म्हणजेच 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजची किंमत 899 युआन म्हणजेच सुमारे 10,800 रुपये आहे. कंपनीच्या साइटवरून Redmi 12C ची विक्री सुरू झाली असून तो सी ब्लू, मिंट ग्रीन, शॅडो ब्लॅक आणि लव्हेंडर कलरमध्ये खरेदी करता येईल.

हेही वाचा : Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

redmi 12c launched with mediatek helio g85 soc 50mp camera price and specifications
Live in Relationship : लिव्ह इन रिलेशनशिपवर अलाहाबाद हायकोर्टाचा मोठा निर्णय; 'दोन प्रौढ व्यक्ती…'

Redmi 12C चे स्पेसिफिकेशन

Redmi 12C मध्ये 6.71-इंचाचा HD Plus डिस्प्ले दिला आहे, ज्याची ब्राइटनेस 500 nits आहे. Redmi 12C मध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसरसह ग्राफिक्ससाठी Mali-G52 GPU आहे. याशिवाय 6 GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 128 GB पर्यंत eMMC 5.1 फ्लॅश मेमरी वापरण्यात आली आहे. फोनसोबत 512 GB मेमरी कार्डसाठी सपोर्ट आहे.

Redmi 12C चा कॅमेरा

Redmi च्या या फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 5-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. कॅमेऱ्यासोबत फ्लॅश लाइटही देण्यात आला आहे. याशिवाय कॅमेऱ्यासोबत एचडीआरसह अनेक मोड देण्यात आले आहेत.

redmi 12c launched with mediatek helio g85 soc 50mp camera price and specifications
Viral Photo : आता चालतं का? भाजपच्या खासदारांचा लंगोट चर्चेत

Redmi 12C ची बॅटरी

कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक, 4G, मायक्रो USB पोर्ट आहे. Redmi 12C मध्ये 5000mAh बॅटरी असून 10W चार्जिंगला सपोर्ट आहे. भारतात, हा फोन टाइप-सी पोर्ट सह लॉंच केला जाऊ शकतो, मात्र सध्या तरी याच्या लॉन्चची कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.