तुम्ही कमी बजेटमध्ये चांगला 5G स्मार्टफोन शोधत असाल, तर Redmi ने तीन स्वस्त आणि पॉवरफुल फोन लॉन्च केले आहेत. कंपनीने Redmi 10 5G, Redmi Note 11S 5G आणि Redmi Note 11 Pro + 5G व्हर्च्युअल Redmi Note 11 सीरीज ग्लोबल लॉन्च इव्हेंटमध्ये लॉन्च केले आहेत.
Redmi 10 5G चे फीचर्स
हा फोन Android-आधारित MIUI 13 वर चालतो आणि 90Hz रिफ्रेश रेटसह 6.58-इंचाचा FHD+ डॉट ड्रॉप डिस्प्ले आहे. फोन स्टँडर्ड 4GB RAM सह ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 700 प्रोसेसर सपोर्टसह येतो. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरचा समावेश असलेला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे.
सेल्फीसाठी, समोर 5-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा सेन्सर आहे. फोन 128GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेजसह येतो, जो microSD कार्डद्वारे वाढवता येतो. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth, GPS/A-GPS, USB Type-C आणि 3.5mm हेडफोन जॅक दिला आहे. फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते (22.5W चार्जर बॉक्समध्ये बंडल केलेले आहे).
Redmi Note 11S 5G चे फीचर्स
हा फोन Android 11 वर आधारित MIUI 13 वर चालतो आणि 90Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटसह 6.6-इंचाचा FHD+ डॉट डिस्प्ले दिला आहे. फोन ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 810 चिपसह 6GB पर्यंत LPDDR4X रॅमसह सुसज्ज आहे. हे ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह येते ज्यामध्ये f/1.8 लेन्ससह 50-मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सर, 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड शूटर आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो शूटर दिला आहे. सेल्फीसाठी, समोर एक 13-मेगापिक्सेल सेन्सर आहे, जो f/2.4 लेन्ससह जोडलेला आहे.
फोन 128GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेजसह येतो जो मायक्रोएसडी कार्डने 1TB पर्यंत वाढवता येतो. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth v5.1, GPS/ A-GPS, इन्फ्रारेड (IR) ब्लास्टर, NFC, USB Type-C आणि 3.5mm हेडफोन जॅक यांचा समावेश आहे. ऑन बोर्ड सेन्सर्समध्ये एक्सीलरोमीटर, एंबियंट लाइट, मॅग्नेटोमीटर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर दिले आहेत. साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. फोनमध्ये ड्युअल स्पीकर आहेत. फोनमध्ये 33W प्रो फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी मिळते. (33W चार्जर बॉक्समध्ये आहे).
Redmi Note 11 Pro+ 5G चे फीचर्स
स्मार्टफोन Android 11 वर आधारित MIUI 12.5 वर चालतो आणि यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 360Hz टच सॅम्पलिंग रेटसह 6.67-इंचाचा FHD+ डिस्प्ले दिला आहे. फोनला ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी 920 चिपसेट सपोर्ट दिला आहे, ज्यामध्ये 8GB पर्यंत LPDDR4X RAM मिळते. एक ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे जो 108-मेगापिक्सेलचे प्रायमरी सेन्सर f/1.8 लेन्ससह, 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड शूटर आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो शूटरसह येतो.
सेल्फीसाठी, समोर 16-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा सेन्सर आहे. फोन 256GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेजसह येतो जो microSD कार्डने 1TB पर्यंत वाढवता येतो. फोनमध्ये 4500mAh बॅटरी आहे जी 120W हायपरचार्ज फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते (120W चार्जर बॉक्समध्ये आहे). फोन जेबीएल आणि हाय-रिस ऑडिओच्या ड्युअल स्पीकर साउंडसह येतो.
किंमती काय आहेत?
- Redmi 10 5G च्या बेस 4GB + 64GB व्हेरियंटची किंमत $199 (अंदाजे रु 15,000) आहे तर 4GB + 128GB व्हेरियंटची किंमत $229 (अंदाजे 17,300 रुपये) आहे. हा फोन अरोरा ग्रीन, क्रोम सिल्व्हर आणि ग्रेफाइट ग्रे रंगांमध्ये उपलब्ध आहे.
- Redmi Note 11S 5G च्या बेस 4GB+64GB व्हेरिएंटची किंमत $249 (अंदाजे रु. 18,800) आहे, तर 4GB+128GB व्हेरियंटची किंमत $279 (अंदाजे 21,100 रुपये) आणि टॉप-एंड 6GB+128GB व्हेरिएंटची किंमत $299, जवळपास 22,600 रुपये आहे. हा मिडनाईट ब्लॅक, स्टार ब्लू आणि ट्वायलाइट ब्लू रंगांमध्ये येते.
- Redmi Note 11 Pro+ 5G च्या बेस 6GB+128GB व्हेरिएंटची किंमत $369 (अंदाजे 27,900 रुपये) आहे, तर 8GB+128GB व्हेरिएंटची किंमत $399 (अंदाजे 30,200 रुपये) आहे आणि टॉप 8GB+256GB व्हेरिएंटची किंमत $449, (अंदाजे 34,000 रुपये) पेक्षा जास्त आहे. हा फॉरेस्ट ग्रीन, ग्रेफाइट ग्रे आणि स्टार ब्लू रंगांमध्ये उपलब्ध आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.