रेडमीचे Note 11S, Note 11 भारतात लॉंच, वाचा किंमत-फीचर्ससह सर्वकाही

Redmi note 11s and note 11 launched in india check price specifications details here
Redmi note 11s and note 11 launched in india check price specifications details here
Updated on

Xiaomi ने त्याचे लोकप्रिय मिड-बजेट रेंज स्मार्टफोन्स Redmi Note 11 आणि Redmi Note 11S भारतात लॉन्च केले आहेत. Redmi चे हे लेटेस्ट स्मार्टफोन Redmi Note 10 सीरीजचे सक्सेसर म्हणून सादर करण्यात आले आहेत. Redmi Note 11 आणि Redmi Note 11S सोबत, कंपनीने Redmi Smart TV आणि Redmi Smart Band Pro स्मार्टवॉच देखील लॉन्च केले आहेत. लॉन्च इव्हेंट रेडमी इंडियाच्या अधिकृत YouTube चॅनेलवर live करण्यात आला. या दोन स्मार्टफोन्सच्या सर्व व्हेरिएंटच्या किंमती आणि फिचर्सच्या संबंधित प्रत्येक डिटेल आपण जाणून घेणार आहोत.

Redmi Note 11 ची भारतात किंमत

Redmi Note 11 ची किंमत, जी 4GB + 64GB स्टोरेज ऑप्शनसाठी भारतात 13,499 रुपये आहे. 6GB + 64GB व्हेरिएंटची किंमत 14,499 रुपये आहे, तर 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. फोनची विक्री 11 फेब्रुवारीपासून Amazon India, Mi.com, Mi Home Stores वर सुरू होईल.

Redmi Note 11 चे स्पेसिफिकेशन

Redmi Note 11 मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.43-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले दिला आहे. तसेच फोनमध्ये Snapdragon 680 SoC असून 6GB पर्यंत RAM आहे. फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh बॅटरी दिली असून Note 11 मध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड सेन्सर आणि दोन 2MP सेन्सरसह क्वाड-कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा असून डिव्हाइस Android 11-आधारित MIUI 13 आउट-ऑफ-द-बॉक्स वर चालतो.

Redmi note 11s and note 11 launched in india check price specifications details here
उभ्या गाड्यांनाही आगीचा धोका! Hyundai, Kia ने लाखो कार मागवल्या परत

Redmi Note 11S ची भारतातील किंमत

Xiaomi ने Redmi Note 11S हा तीन स्टोरेज ऑप्शनमध्ये लॉन्च केली आहे. बेस 6GB + 64GB व्हेरिएंटची किंमत 16,499 रुपये आहे. हे 6GB + 128GB आणि 8GB + 128GB पर्यायांमध्ये देखील येतो, ज्याची किंमत 17,499 रुपये आणि 18,499 रुपये आहे. डिव्हाइसची विक्री 16 फेब्रुवारीपासून Amazon India, Mi.com, Mi Home Stores वर सुरू होईल.

Redmi note 11s and note 11 launched in india check price specifications details here
तुम्हीही कधीतरीच दारु पिता? मग आरोग्यासंबंधी ही बातमी एकदा वाचाच

Redmi Note 11S चे स्पेसिफिकेशन

Redmi Note 11S मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.43-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले दिला आहे. 16MP फ्रंट कॅमेर्‍यासाठी वरच्या मध्यभागी एक होल-पंच कटआउट मिळते. यामध्ये MediaTek Helio G96 प्रोसेसर देण्यात आला आहे. मागील बाजूस क्वाड-कॅमेरा सेटअप असून त्यामध्ये तुम्हाला मुख्य 108MP सेन्सर Xiaomi 11i हायपरचार्ज (रिव्ह्यू) आणि Xiaomi 11T Pro (रिव्ह्यू) मध्ये आढळतो तोच आहे. फोनमध्ये डेप्थ आणि मॅक्रोसाठी 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि दोन 2MP सेन्सर आहेत. डिव्हाइस मध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh बॅटरी मिळते. तसेच हा फोन साइड-माउंट फिंगरप्रिंट स्कॅनर आणि 3.5 मिमी हेडफोन जॅकसह येतो. फोनमध्ये स्टीरिओ स्पीकर सेटअप देखील आहे.

Redmi note 11s and note 11 launched in india check price specifications details here
NFT म्हणजे काय? त्याबद्दल इतकी चर्चा का होतेय? जाणून घ्या सोप्या भाषेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()