Redmi Note 12 Pro and Redmi Note 12 Pro Plus Launched in India : Xiaomi च्या Redmi ब्रँडने शेवटी भारतात आपली Redmi Note 12 सीरीज लॉन्च केली आहे. यानुसार Redmi Note 12 Pro आणि Redmi Note 12 Pro+ भारतात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
5 जानेवारी 2022 रोजी आयोजित कार्यक्रमात, या दोन प्रो स्मार्टफोन्स व्यतिरिक्त, Redmi ने Redmi Note 12 5G चे अनावरण केले . Redmi Note 12 Pro आणि Redmi Note 12 Pro Plus स्मार्टफोन डॉल्बी व्हिजन सपोर्ट, 120Hz रिफ्रेश रेट, 12GB पर्यंत RAM यासारख्या फीचर्ससह येतात. प्रो प्लस व्हेरियंटची खासियत म्हणजे यात दिलेला 200-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा. चला जाणून घेऊया सविस्तर…
Redmi Note 12 Pro, Redmi Note 12 Pro+ ची भारतात किंमत
Redmi Note 12 Pro च्या 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे. त्याच वेळी, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 26,999 रुपयांना आणि 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 27,999 रुपयांना लॉन्च केला गेला आहे. हँडसेट स्टारडस्ट पर्पल आणि फ्रॉस्टेड ब्लू कलरमध्ये येतात.
Redmi Note 12 Pro+ स्मार्टफोन आर्कटिक व्हाईट, आइसबर्ग ब्लू आणि ऑब्सिडियन ब्लॅक रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. फोनचा 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 29,999 रुपयांना आणि 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 32,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे.
हेही वाचा - ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड
हे दोन्ही Redmi फोन 11 जानेवारीपासून Flipkart, Mi.com, Mi Home Store आणि ऑफलाइन रिटेल स्टोअरवर उपलब्ध केले जातील. ICICI बँक कार्ड आणि EMI / एक्सचेंज बोनससह फोन घेतल्यावर रु. 3000 ची इस्टंट सूट देखील मिळेल. याशिवाय Redmi आणि Xiaomi/ Mi फोनच्या एक्सचेंजवर आणि नवीन स्मार्टफोन घेतल्यावर 1000 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट देखील दिला जात आहे.
Redmi Note 12 Pro 5G, Redmi Note 12 Pro+ 5G चे फीचर्स
Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro + 5G स्मार्टफोन्समध्ये 6.67-इंच फुलएचडी + (1080×2400 पिक्सेल) OLED डिस्प्ले दिला आहे. स्क्रीन 30/60/90/120Hz रिफ्रेश रेट देते. डिस्प्लेचा टच सॅम्पलिंग रेट 240 Hz आहे. स्क्रीन डॉल्बी व्हिजन, HDR10+ आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 संरक्षणासह येते. फोनमध्ये octa-core MediaTek Dimensity 1080 6nm प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी Mali-G68 MC4 GPU देण्यात आला आहे.
Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro+ 5G मध्ये 6 GB आणि 8 GB रॅमसह 128 GB स्टोरेज आणि 8 GB आणि 12 GB रॅमसह 256 GB इनबिल्ट स्टोरेजचा पर्याय दिला आहे. हे दोन्ही फोन Android 12 आधारित MIUI 13 सह येतात. हा हँडसेट ड्युअल-सिमला सपोर्ट करतो.
Redmi Note 12 Pro मध्ये अपर्चर F/1.88 आणि OIS सपोर्टसह 50-मेगापिक्सेल प्राइमरी, अपर्चर F/2.2 सह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल आणि ऍपर्चर F/2.4 सह 2-मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरे दिले आहेत.
Redmi Note 12 Pro Plus बद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये Aperture F/1.65 सह 200-megapixel प्राइमरी रियर सेन्सर दिला आहे. स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर्स दिले आहेत.
दोन्ही लेटेस्ट Redmi फोन्समध्ये 16-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे ज्यामध्ये अपर्चर F/2.45 आहे. स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि इन्फ्रारेड सेन्सरही उपलब्ध आहेत. हे स्मार्टफोन धूळ आणि स्प्लॅश प्रतिरोधक आहेत आणि IP53 रेटिंगसह येतात.
या फोनमध्ये 3.5mm ऑडिओ जॅक, डॉल्बी अॅटमॉस, 5G, ब्लूटूथ 5.2, GPS, GLONASS, Dual 4G VoLTE, Wi-Fi 6 802.11 ac आणि USB Type-C सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. हे स्मार्टफोन 5000mAh बॅटरीसह येतात. Redmi Note 12 मध्ये 67W तर Redmi Note 12 Pro Plus मध्ये 120W फास्ट चार्जिंग पर्याय देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.