Redmi Note 14 Launch : लवकरच भारतात येणार Redmi Note 14 सिरीज; सुपरफास्ट चार्जिंग अन् एकदम खास फीचर्स

Redmi Note 14 Pro Leaked Specs and Features Ahead of Launch : Redmi कंपनीने त्यांच्या नवीन Note 14 सिरीजची घोषणा केली असून ही सिरीज या महिन्याच्या अखेरीस चीनमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.
Redmi Note 14 Series Smartphone
Redmi Note 14 Series Launch Detailsesakal
Updated on

Redmi Note 14 Series Launch : रेडमी आपली नवीन Note 14 सिरीज लवकरच भारतात लॉन्च करणार आहे. ही सिरीज कंपनीच्या जनरल मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार टिकाऊपणा, पाणी आणि धूळ प्रतिरोधकता आणि बॅटरी लाइफमध्ये मोठ्या सुधारणा करणार आहे.

Redmi कंपनीने त्यांच्या नवीन Note 14 सिरीजची घोषणा केली असून ही सिरीज या महिन्याच्या अखेरीस चीनमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. या सिरीजमध्ये विशेषतः टिकाऊपणा, पाण्याचे आणि धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी IP68 रेटिंग दिले जाणार आहे. कंपनीच्या जनरल मॅनेजर थॉमस वांग यांनी या फोनच्या काही वैशिष्ट्यांबाबत माहिती दिली आहे.

Redmi Note 14 Series Smartphone
Smartphone Tips : मोबाईल सारखा गरम होतोय? पटकन करून घ्या हे काम,नाहीतर होईल मोठे नुकसान

Redmi Note 14 सिरीजमध्ये अधिक टिकाऊ बॅटरी आणि जलद चार्जिंग तंत्रज्ञानाची अपेक्षा आहे. Redmi Note 13 Pro+ मध्ये 5,000mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग उपलब्ध होते, आणि आता या नवीन सिरीजमध्ये यापेक्षा मोठ्या बॅटरी आणि अधिक जलद चार्जिंग क्षमता मिळण्याची शक्यता आहे.

Redmi Note 14 Series Smartphone
Vivo T3 Ultra Smartphone : भारतात लाँच होणार Vivo T3 Ultra; ब्रँड कॅमेरा आणि दमदार बॅटरी असलेल्या स्मार्टफोनचा व्हायरल व्हिडिओ पाहा

या सिरीजमध्ये Snapdragon 7s Gen 3 SoC प्रोसेसर, 1.5K रिझोल्यूशन डिस्प्ले आणि 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असलेला ट्रिपल कॅमेरा सेटअप असणार आहे. भारतात लवकरच हा फोन उपलब्ध होण्याची शक्यता आहे कारण याला भारतीय मानक ब्युरोच्या वेबसाईटवर पाहण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.