Redmi India ने आपल्या मेगा इव्हेंटमध्ये Redmi Smart Band Pro लाँच केला आहे. Redmi Smart Band Pro ला Redmi Note 11 आणि Redmi Note 11S सह लॉंच करण्यात आले आहे. Redmi च्या या स्मार्ट बँडमध्ये 110 वर्कआउट मोड दिले आहेत. Redmi Smart Band Pro च्या बॅटरीबाबत 14 दिवसांच्या बॅकअपचा दावा करण्यात आला आहे. Redmi Smart TV X43 देखील इव्हेंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.
रेडमी स्मार्ट बँड प्रो चे स्पेसिफिकेशन
रेडमी स्मार्ट बँड प्रो मध्ये 1.47-इंचाचा अलवेज ऑन AMOLED डिस्प्ले दिला आहे ज्यामध्ये टच सपोर्ट दिला आहे. यासोबत अपोलो 3.5 प्रोसेसर आणि 200mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्याला 14 दिवसांचा बॅकअप मिळेल असा दावा करण्यात आला आहे. पॉवर सेव्हिंग मोडमध्ये बॅटरी 20 दिवस टिकेल. रेडमी स्मार्ट बँड प्रो सह LifeQ हेल्थ ट्रॅकिंग अल्गोरिदम मिळेल ज्यात पीपीजी हार्ट रेट सेन्सरसाठी सपोर्ट देखील आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, यात ब्लूटूथ v5.0 आहे आणि याला वॉटर रेझिस्टंटसाठी 5ATM रेटिंग मिळाले आहे.
यामध्ये 110 वर्कआउट मोड्ससह ब्लड ऑक्सिजनचा ट्रॅक करण्यासाठी एक SpO2 सेन्सर देखील आहे. याशिवाय यात स्लीप ट्रॅकिंग देखील आहे. हा बँड अनेक प्रकारचे व्यायाम आपोआप डिटेक्ट करतो. यात स्ट्रेस मॉनिटरींग आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम देखील आहेत.
Redmi Smart Band Pro ची किंमत
Redmi Smart Band Pro ची किंमत 3,999 रुपये ठेवण्यात आली आहे, परंतु ऑफर अंतर्गत हा बँड 3,499 रुपयांना खरेदी करता येईल. त्याची विक्री 14 फेब्रुवारीपासून Mi Home, Amazon आणि ऑफलाइन स्टोअर्समधून होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.