Reliance AGM 2024 : आला अंबानींचा जिओ ब्रेन ! 5G नेटवर्क अन् JioAirFiberबद्दल काय म्हणाले मुकेश अंबानी? जाणून घ्या

Reliance AGM 2024 Mukesh Ambani Discusses Jio Brain, 5G Innovations, and JioAirFiber Growth : मुकेश अंबानी यांनी आज कंपनीच्या 47व्या AGM मध्ये अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. या घोषणांमध्ये Jio Brain, 5G आणि JioAirFiberचा समावेश आहे.
mukesh ambni jio brain ai
mukesh ambni jio brain aiesakal
Updated on

Reliance AGM 2024 Announcements : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी आज कंपनीच्या 47व्या AGM मध्ये अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. या घोषणांमध्ये Jio Brain, 5G आणि JioAirFiberचा समावेश आहे.

मुकेश अंबानी यांनी Jio Brain या नावाने एक नवीन AI प्लॅटफॉर्म जाहीर केले. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने Jio कंपनी AI क्षेत्रात आणखी वेगवान आणि अचूक काम करू शकणार आहे. याशिवाय अंबानी यांनी JioAirFiber या 5G-आधारित घरगुती ब्रॉडबॅंड सेवाही लॉन्च केल्याची माहिती दिली.

Jio Brain AI क्षेत्रातील क्रांती

मुकेश अंबानी यांनी Jio Brain या नावानं एक नवीन AI प्लॅटफॉर्म जाहीर केले. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने Jio कंपनी AI क्षेत्रात आणखी वेगवान आणि अचूक काम करू शकणार आहे. Jio Brain हा AI मधील सर्व साधनांचा आणि प्लॅटफॉर्म्सचा समावेश करणारा एक व्यापक संच आहे. याच्या मदतीने Jio कंपनी AIचा वापर सर्वत्र वाढवू शकणार आहे. यामुळे कंपनीचे निर्णय वेगवान, भविष्यवाणी अधिक अचूक आणि ग्राहकांच्या गरजांचे अधिक चांगले आकलन करू शकणार आहे.

mukesh ambni jio brain ai
Reliance AGM 2024 Live : Jio यूजर्ससाठी खुशखबर! आता मिळणार तब्बल 100 GB मोफत क्लाउड स्टोरेज,मुकेश अंबानींची मोठी घोषणा

JioAirFiber 5G-आधारित घरगुती ब्रॉडबॅंड सेवा

मुकेश अंबानी यांनी JioAirFiber या 5G-आधारित घरगुती ब्रॉडबॅंड सेवाही लॉन्च केल्याची माहिती दिली. ही सेवा गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लॉन्च करण्यात आली होती. अंबानी यांनी सांगितले की फक्त 6 महिन्यांपेक्षा कमी काळात त्यांना 1 लाख JioAirFiber ग्राहक मिळाले आहेत. हे एक मोठे यश आहे आणि जगातील सर्वात वेगवान यश आहे. पण ही फक्त सुरुवात आहे. आपल्या डीप-टेक क्षमतांचा आणि प्रत्येक प्रक्रियेचे निरंतर ऑप्टिमायझेशन करून आम्ही पुढचे 10 लाख JioAirFiber ग्राहक फक्त 100 दिवसांत मिळवले.

mukesh ambni jio brain ai
Jio Netflix Recharge : जिओ वापरकर्त्यांची चांदी! स्वस्त रिचार्ज प्लॅनसोबत मिळतंय 3 महिन्यांचं Netflix फ्री सबस्क्रिप्शन

आम्ही आता स्वतःला आणखी वेग वाढवण्याचे आव्हान देत आहोत. आम्ही आता दर 30 दिवसांनी 10 लाख घरं JioAirFiberशी जोडण्याचे लक्ष्य ठेवत आहोत. या वेगाने आम्हाला 100 मिलियन घरगुती ब्रॉडबॅंड ग्राहक गाठण्याचे लक्ष्य आम्ही रेकॉर्ड वेगाने पूर्ण करू शकू. आजच्या डिजिटल युगात उन्नत होण्यासाठी आवश्यक कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही 20 मिलियनहून अधिक लहान आणि मध्यम व्यवसाय लक्ष्य करीत आहोत,असेही मुळेसह अंबानी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.