किराणा सामान आणण्यासाठी गृहिणींना आता कुणाची मनधरणी करावी लागणार नाही. हे काम आता व्हॉट्सॲपवरून देखील करता येणार आहे. ग्राहक आता या 'चॅटींग विथ शॉपिंग' करत किराणा कॅटलॉग वरून वस्तूची निवड करू शकतील. तसेच व्हॉट्सॲप चॅट सोडून जिओमार्टवर पेमेंट सुद्धा करू शकतील.
मेटा आणि जिओ प्लॅटफॉर्मने व्हॉट्सॲपवर जिओमार्टसोबत एन्ड टू एन्ड शॉपिंग (Online Shopping) एक्सपीरियन्स आणण्यासाठी पार्टनरशीप केली आहे. जिओमार्टसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे.
संपूर्णपणे चॅटींगवर पार पाडली जाणारी ही पहिलीच शॉपिंग प्रक्रिया असेल. सध्या बिझनेस मॅसेजिंगचा जमाना आहे. त्यामुळे ग्राहकांनाही शॉपिंग चॅटींगचा अनुभव मिळणे गरजेचे असल्याचे मतही मार्क झुकेरबर्ग म्हणाले.
अशी करा 'चॅटींग विथ शॉपिंग'
व्हॉट्सॲप ओपन करा आणि जिओमार्ट नंबरवर "Hi" पाठवावे लागेल. आता तुम्हाला "गेट स्टार्टेड" ऑप्शन सोबत एक शुभेच्छा संदेश दिसेल.आता “व्ह्युव कॅटलॉग” वर टॅप करा. आपला ‘पिनकोड’ टाका.
आता कार्ट मध्ये आपल्या पसंतीच्या वस्तू जोडण्यासाठी "+" आयकॉनवर टॅप करा. एकदा प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही वर दिलेल्या उजव्या बाजुच्या कोपऱ्यातील कार्ट आयकॉनवर टॅप करून कार्ट मध्ये जावू शकता किंवा स्क्रीनच्या खाली " व्ह्युव कार्ट" ऑप्शनवर टॅप करू शकता.
संकेत मिळाल्यानंतर आता तुम्ही आपला पत्ता देऊन कॅश ऑन डिलिव्हरी, पे ऑन जिओ मार्ट, पे ऑन व्हॉट्सॲप यासारखे पेमेंट मोड निवडू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.