रिलायन्स जिओ ही देशातील त्या दूरसंचार कंपन्यांपैकी एक आहे ज्याने फार कमी कालावधीत बाजारात दबदबा निर्माण केला आहे. रिलायन्सकडे त्यांच्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या रेंजमध्ये प्रीपेड प्लॅन्स आहेत, तर कंपनी पोस्टपेड प्लॅनसाठीही अनेक पर्याय ऑफर करते.
जर तुम्ही अशा वापरकर्त्यांपैकी एक असाल ज्यांना भरपूर डेटा आणि Netflix, Amazon Prime Video सारख्या अॅप्सचा एक्सेस हवा असेल तर कंपनीचा 399 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो. चला जाणून घेऊया जिओच्या 399 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनबद्दल सर्व काही...
रिलायन्स जिओचा 399 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
399 रुपयांच्या रिलायन्स जिओच्या पोस्टपेड प्लॅनला 28 दिवसांची वैधता मिळते. या पोस्टपेड प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना 75 जीबी डेटा ऑफर करते. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेला हा डेटा संपल्यानंतर ग्राहकांना प्रति जीबी 10 रुपये द्यावे लागतील. या पोस्टपेड प्लॅनमध्ये एकूण 200 GB डेटा रोलओव्हर सुविधा उपलब्ध आहे.
याशिवाय रिलायन्स जिओच्या या पोस्टपेड प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलची सुविधाही आहे. म्हणजेच देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉल करता येतात. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 100 एसएमएस मोफत दिले जातात.
रिलायन्स जिओ पोस्टपेड प्लस सेवेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये उपलब्ध मोफत OTT सबस्क्रिप्शन, जिओच्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइमची मोफत मेंबरशिप मिळते .
हे लक्षात घेण्यासारखे आहे की जिओच्या या प्लॅनमध्ये उपलब्ध Amazon प्राइम व्हिडिओ सदस्यत्व 1 वर्षासाठी वैध आहे. याशिवाय ग्राहकांना या अॅपमध्ये या प्लॅनमध्ये Jio TV, JioSecurity आणि JioCloud अॅप्सचाही फ्री एक्सेस देखील मिळेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.