Jio cheap 5g smartphone: रिलायन्स जिओने काही दिवसांपूर्वीच परवडणाऱ्या दरात लॅपटॉप लाँच केला होता. यानंतर आता कंपनी सर्वात स्वस्त 5G मोबाईल लाँच करण्याच्या तयारीत आहे. या फोनबाबत कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत घोषणा होऊ शकते.
रिलायन्सची 46वी वार्षिक सर्वसाधारण सभा 28 ऑगस्टला आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये कंपनीचे चेअरमन भविष्यात येणाऱ्या JioPhone 5G सोबत इतर मोठ्या घोषणा करू शकतात. आज तकने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
जिओच्या 5G मोबाईलबद्दल सध्या अगदी कमी माहिती समोर आली आहे. हा एक अल्ट्रा-अफॉर्डेबल मोबाईल असेल असं सांगण्यात येत आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार याची किंमत 8 ते 10 हजार असेल असं म्हटलं आहे. मात्र, काही ठिकाणी हा त्याहून स्वस्त मोबाईल असू शकतो असं सांगण्यात येत आहे. (Affordable 5G smartphone)
JioPhone 5G मध्ये 4GB रॅम असू सकते. तसेच, यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चिपसेट देण्यात येऊ शकते. स्नॅपड्रॅगन 480+ हा प्रोसेसर जिओच्या या फोनमध्ये असू शकतो. कंपनीने यासाठी क्वालकॉमसोबत पार्टनरशिप केल्याचं आधीच समोर आलं आहे.
या फोनमध्ये 13MP क्षमतेचा ड्युअल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. तसंच, 8MP क्षमतेचा फ्रंट कॅमेरा असू शकतो. नव्या जिओफोनमध्ये 6.5 इंच HD+ LCD डिस्प्ले देण्यात येईल, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz असेल असं म्हटलं जात आहे.
या फोनमध्ये 5,000 mAh क्षमतेची बॅटरी असू शकते, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. तसंच यामध्ये अँड्रॉईड 13 आऊट ऑफ दि बॉक्स मिळू शकतं.
जिओ कंपनीने अद्याप या फोनबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केली नाहीये. मात्र, Geekbench या वेबसाईटवर Jio LS1654QB5 नावाने हा फोन लिस्ट करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.