Android Apps: 'या' पाच अँड्रॉइड अ‍ॅप्सपासून राहा सावध; तुमचे बँक खाते होऊ शकते हॅक

remove these five android apps can hack and drain your bank accounts
remove these five android apps can hack and drain your bank accounts
Updated on

तुम्ही जर अँड्रॉइड यूजर असाल तर तुम्हाला खूप सावध राहण्याची गरज आहे कारण अनेक अँड्रॉइड अ‍ॅप्स बँकिंगसाठी धोकादायक ठरू शकतात. नेदरलँडच्या एका फर्मने आपल्या अहवालात काही अँड्रॉइड अ‍ॅप्सची माहिती दिली आहे, जे त्यांच्या अ‍ॅपद्वारे अँड्रॉईड डिव्हायसेसमध्ये ट्रोजन व्हायरस इन्स्टॉल करत आहेत. हे वापरकर्त्यांचे लॉगिन डिटेल्स, खाते क्रमांक आणि इतर आर्थिक व्यवहारांसंबंधी माहिती चोरू शकते. तुमच्या फोनमध्येही हे अॅप्स असतील तर तुम्ही ते लगेच तुमच्या फोनमधून डिलीट करावेत.

अनेक देशांमध्ये वितरण

नेदरलँडमधील या कंप्युटर सपोर्ट फर्मचे नाव थ्रेट फॅब्रिक (Threat Fabric) आहे. संशोधकाने आपल्या अहवालात असा दावा केला आहे की अँड्रॉइड बँकिंग ट्रोजन डिस्ट्रिब्यूट करण्याची ही पद्धत अत्यंत धोकादायक आहे कारण पीडितांना याची माहिती उशिरा कळते आणि तोपर्यंत त्यांची बँकिंग आणि वैयक्तिक माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचते. रिपोर्टनुसार अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, पोलंड, स्पेन आणि इटली यांसारख्या देशांमध्ये या ट्रोजनचे डिस्ट्रिब्युशन वाढले आहे आणि अशा ट्रोजन अ‍ॅप्सना पटकन ओळखणे देखील कठीण आहे.

remove these five android apps can hack and drain your bank accounts
Jio Recharge Plan: जिओचा 500 रुपयांखालील बेस्ट रिचार्ज प्लॅन; मिळतो अमर्यादित कॉलिंगसह डेटा

या अ‍ॅप्समध्ये धोकादायक ट्रोजन व्हायरस सापडला

कॉम्प्युटर सपोर्ट फर्मने हे पाच अँड्रॉइड अ‍ॅप्स तात्काळ डिव्हाईसमधून काढून टाकण्याचा सल्ला दिला आहे. हे अ‍ॅप्स माय फायनान्स My Finances Tracker, File Manager Small, Lite, Zetter Authentication, Codice Fiscale 2022 आणि Recover Audio, Images & Videos यांचा समावेश आहे. तुमच्या फोनमध्ये यापैकी कोणतेही अ‍ॅप असल्यास ते त्वरित हटवा.

remove these five android apps can hack and drain your bank accounts
Nokia G60 5G: लवकरच भारतात येतोय Nokia चा 5G फोन, कमी किंमतीत मिळतील दमदार फीचर्स

17 अँड्रॉइड अ‍ॅप्समध्ये आढळला होता धोकादायक व्हायरस

अलीकडेच मालवेअर एनालिस्टना Google Play Store वर डझनभर व्हायरस अॅप्स आढळले होते, यामध्ये मुख्यतः अ‍ॅडवेअर ट्रोजन मालवेअर होते. यासोबतच स्कॅमर्सद्वारे वापरण्यात येणारे बनावट अ‍ॅप्स आणि गोपनीय डेटाला टार्गेट करणारे आणि डेटा चोरणारे इतर अ‍ॅप्सही सापडले आहेत. हे अ‍ॅडवेअर ट्रोजन 9.89 मिलीयन पेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केले होते. या अ‍ॅप्समध्ये इमेज-एडिटिंग सॉफ्टवेअर, व्हर्च्युअल कीबोर्ड, सिस्टम टूल्स आणि युटिलिटीज, कॉलिंग अ‍ॅप्स, वॉलपेपर कलेक्शन यासारख्या अ‍ॅप्सचाही समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()