आता पेट्रोल-डिझेल चिंता सोडा, Renault घेऊन येतेय हायड्रोजन कार

Renault hydrogen car will be rollout soon check out its design price and features here
Renault hydrogen car will be rollout soon check out its design price and features here
Updated on

तंत्रज्ञानाच्या बाबतीत ऑटोमोबाईल कंपन्या झपाट्याने प्रगत होत आहेत. पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीनंतर सेमी हायब्रीड आणि पूर्ण हायब्रीड वाहने बाजारात येत आहेत. आता ऑटोमोबाईल कंपन्या नेक्स्ट फ्युएल सेल (हायड्रोजन पॉवर फ्युएल) पॉवरवर चालणारी वाहने घेऊन येत आहेत. जगातील मोठ्या कंपन्या, टोयोटा, ह्युंदाई आणि निकोला सारख्या कंपन्या या इंधन सेलमधून चालणारी वाहने बनवत आहेत. यासोबतच अनेक स्टार्टअप कंपन्या देखील यात भाग घेत आहेत. फ्रेंच कार निर्माता कंपनी रेनॉने हायड्रोजनवर चालणाऱ्या नवीन कारचा टीझर फोटो पोस्ट केला आहे. Renault ही कार लवकरच सादर करू शकते.

लवकरच कार निर्माता Renault हायड्रोजनवर चालणारी कार लॉन्च करणार आहे. या नवीन कॉन्सेप्ट कारचा फोटोही कंपनीने पोस्ट केला आहे. कार निर्माता कंपनी ही कार मे 2022 मध्ये सादर करू शकते. कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल असणार आहे. ही कंसेप्ट कार रेनॉल्टची हायड्रोजन कार क्षेत्रातील ही पहिली टेस्ट आहे.

पेट्रोलियमवर आधारित गाड्या बंद केल्या जातील

Renault ने हायड्रोजनवर आधारित वाहन बाजारात प्रवेश करण्याचा आपला इरादा उघड केला आहे. त्याच्या नवीन योजनेचा भाग म्हणून, रेनॉचे लक्ष्य पेट्रोल किंवा डिझेलवर चालणाऱ्या ICE मॉडेल्सची संख्या कमी करण्याचे आहे. आगामी हायड्रोजन कारचा टीझर रिलीझ करताना, रेनॉल्ट म्हणाले की, हायड्रोजनवर चालणारे हे अद्वितीय वाहन रेनॉ ग्रुप आणि रेनॉल्ट ब्रँडच्या डेकार्बोनायझेशनच्या प्रवासाचे, तसेच सर्कुलर अर्थव्यवस्थेतील त्यांची प्रगती आणि पुनर्वापर आणि रिसायकल करता येण्याजोग्या सामग्रीच्या वापराचे प्रतिनिधित्व करते.

Renault hydrogen car will be rollout soon check out its design price and features here
Wi-Fi 7 दुप्पट स्पीड देणार, पण Wi-Fi 7 नेमकं आहे काय? जाणून घ्या

कशी असेल कार?

टीझर फोटोमध्ये नवीन हायड्रोजन कॉन्सेप्ट कारचा फ्रंट लुक दिसून येतो. यामध्ये कारचे एलईडी हेडलाइट्स दिसत आहेत. ही कॉन्सेप्ट कार कंपनीची इलेक्ट्रिक कार Megane सारखी दिसते. कॉन्सेप्ट कार मेगने EV सारखीच स्लिम हेडलाइट क्लस्टर क्रॉसओव्हर सारखे डिझाईन आहे. टीझर फोटोमध्ये, रेग्युलर काचेच्या ऐवजी, Renault कॉन्सेप्ट कारचे साइड मिरर एवजी फक्त कॅमेरे दिसत आहेत. या बद्दल संपूर्ण माहिती तेव्हाच उघड होईल जेव्हा कंपनी हे मॉडेल तीन महिन्यांनंतर लॉंच करेल, तोपर्यंत केवळ अंदाज लावला जाऊ शकतो.

Renault hydrogen car will be rollout soon check out its design price and features here
दररोज 3GB डेटा, डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शनसह सर्वात स्वस्त प्लॅन

हायड्रोजन कार व्यतिरिक्त कंपनीची आणखी एक योजना आहे. 2035 पर्यंत ICE वाहने टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या EU च्या धोरणानुसार 2030 पर्यंत रेनॉल्टची संपूर्ण लाइनअप पूर्णपणे इलेक्ट्रिकवर स्विच करण्याचा प्लॅन आहे.

Renault hydrogen car will be rollout soon check out its design price and features here
Honda Activa 6G चे स्टँडर्ड व्हेरिएंट कमी किंमतीत करा खरेदी, जाणून घ्या तपशील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.