Renew Driving Licence Online : आरटीओ ऑफिसला जाऊन लर्नर लायसन्स अथवा नवीन ड्राइव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खूपच किचकट असते. लोकांच्या सुविधेसाठी सरकारने ऑनलाइन पोर्टल देखील सुरु केले आहे. जेथे यूजर्स ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भातील सर्व सुविधांचा लाभ घेऊ शकतात.
यामध्ये लर्नर लायसन्स, नवीन लायसन्ससाठी अर्ज, पत्ता बदलणे, लायसन्स रिन्यूअल करणे अशा सेवांचा समावेश आहे. तुम्हाला देखील ऑनलाइन ड्राइव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करायचा असल्यास आम्ही तुम्हाला याच्या संपूर्ण प्रक्रियेविषयी माहिती देत आहोत.(Driving Licence)
ड्रायव्हिंग लायसन्सचे प्रकारः
गियरशिवाय मोटारसायकलसाठी वाहन चालविण्याचा परवाना
हलकी मोटार वाहनांसाठी वाहन चालविण्याचा परवाना
परिवहन वाहनांसाठी वाहन चालविण्याचा परवाना
लायसन्स रिन्युव करण्यासाठीची कागदपत्रे
फॉर्म ९ पूर्णपणे भरलेला असणे गरजेचे आहे व सही केलेली असावी.
मूळ ड्रायव्हिंग लायसन्सची कॉपी गरजेची आहे.
ड्राइव्हरचे वय ४० पेक्षा अधिक असल्यास फॉर्म १ए सोबत मेडिकल सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.
पासपोर्ट साइज फोटो - २
सेल्फ-अटेस्टेड वय व पत्त्याचा पुरावा
२०० रुपये शुल्क.
ऑनलाईन पद्धत
ऑनलाईन ड्रायव्हिंग परवाना रिन्यू करण्यासाठी सगळ्यात आधी भारत सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर https://parivahan.gov.in/parivahan/ जा.
– इथे गेल्यावर डावीकडील ऑनलाईन पर्यायावर क्लिक करा.
– यानंतर ‘सर्विसेस ऑन ड्राइविंग लाइसेंस’ वर क्लिक करा आणि पुढील दिलेली माहिती भरा.
– अर्जामध्ये दिलेली माहिती भरून कागदपत्रंही जोडा.
– अर्ज आणि कागदपत्रं भरल्यानंतल ऑनलाईन प्रोसेस पूर्ण होते.
– यानंतर काही दिवसांत ड्रायव्हिंग परवाना तुम्ही दिलेल्या पत्त्यावर येईल.
ऑफलाईन पद्धत
जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करत असल्यात त्यावेळी प्रथम तुम्हाला आरटीओ ऑफिसला भेट द्यावी लागणार आहे. येथे तुम्हाल Form-9 घ्यावा लागणार आहे.
या फॉर्मसाठी तुम्हाला महत्वाची कागदपत्र द्यावी लागणार आहेत.
फोनमध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित माहिती भरावी लागणार आहे. तसेच फोटो सुद्धा लावावा लागणार आहे.
यासाठी तुम्हाला 200 रुपये द्यावे लागणार आहेत. मेडिकल सर्टिफिकेट मध्ये काही बदल झाल्यास तुम्हाला टेस्ट स्टॉल बुक करावा लागणार आहे.
यानंतर तुम्हाला एक परिक्षा सुद्धा द्यावी लागणार आहे. त्यामध्ये जर तुम्ही पास झाल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स काही दिवसांनी दिले जाणार आहे.
महाराष्ट्रात DL च्या रिन्युव करण्यासाठीची कागदपत्रे
फॉर्म 2 (DL नूतनीकरणासाठी अर्ज) फॉर्म 1 (फिटनेस प्रमाणपत्र) फॉर्म 1A
(40 वर्षांवरील अर्जदारांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा वाहतूक श्रेणी DL नूतनीकरण)
मूळ ड्रायव्हिंग लायसन्स
पत्ता आणि वयाचा पुरावा (आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, इ.)
पासपोर्ट आकाराचे फोटो
DL साठीची प्रोसेस
URL मध्ये टाइप करा: https://parivahan.gov.in/parivahan/ पोर्टलला भेट द्या
ऑनलाइन सेवांच्या सूचीमधून "ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित सेवा" वर क्लिक करा.
तुमचे राज्य निवडा (महाराष्ट्र) आणि पुढील पृष्ठावरील “अपॉइंटमेंट्स” वर क्लिक करा.
स्लॉट बुकिंग मेनूमधून “LL/DL स्लॉट बुकिंग” वर क्लिक करा.
तुमचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सत्यापन कोड यासारखे तपशील भरा.
स्लॉटची उपलब्धता तपासण्यासाठी "सबमिट" वर क्लिक करा आणि ऑनलाइन भेटीची वेळ निश्चित करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.