Brain Cancer : मोबाईल फोनच्या अतिवापराने मेंदूचा कर्करोग होत नाही? संशोधकांनी केला धक्कादायक खुलासा

Research Finds Mobile Overuse causes to Brain Cancer : मोबाईल फोनचा मेंदूच्या कर्करोगाशी कोणताही संबंध नाही, असा निष्कर्ष 28 वर्षांच्या संशोधनाचा आढावा घेतल्यानंतर आला आहे. या दीर्घकालीन अध्ययनातून असे दिसून आले की मोबाइल फोनच्या रेडिएशनमुळे कर्करोगाचा धोका वाढत नाही.
Mobile Overuse causes to Brain Cancer
Mobile Overuse causes to Brain Canceresakal
Updated on

Mobile Use Disadvantages : मोबाईल फोनचा आरोग्यावर परिणाम हा एक चर्चेचा विषय आहे, कारण मोबाइलचा दीर्घकाळ वापर आणि त्याच्या रेडिएशनमुळे होणाऱ्या शक्य तितक्या समस्यांवर संशोधन झाले आहे. मोबाईल फोनमधील रेडिएशन (EMF - इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्स) शरीरावर परिणाम होतो.

मोबाइल फोनचा मेंदूच्या कर्करोगाशी कोणताही संबंध नाही, असा निष्कर्ष 28 वर्षांच्या संशोधनाचा आढावा घेतल्यानंतर आला आहे. या दीर्घकालीन अध्ययनातून असे दिसून आले की मोबाइल फोनच्या रेडिएशनमुळे कर्करोगाचा धोका वाढत नाही. या निष्कर्षामुळे मोबाइल फोनच्या वापरासंदर्भात दीर्घकाळापासून असलेल्या शंकांचा अंत झाला आहे.

तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे, विशेषतः मोबाइल फोनच्या वाढत्या वापरामुळे, त्याचा आरोग्यावर परिणाम होईल का याबाबत अनेक लोक चिंतित होते. 1990 च्या दशकापासून विविध शास्त्रज्ञांनी आणि संस्थांनी या विषयावर संशोधन केले. अनेक प्रयोग आणि लोकसंख्येवर केलेल्या सर्वेक्षणांतून हे स्पष्ट झाले की मोबाइल फोनच्या वापरामुळे मेंदूच्या कर्करोगाचा धोका वाढत नाही.

Mobile Overuse causes to Brain Cancer
Ganesh Chaturthi Festival 2024 : यंदाच्या गणेशोस्तव अधिक सुरक्षित अन् प्रकाशमय; महावितरणने मंडळांना केले आवाहन

मोबाइल फोनच्या रेडिएशनमुळे शरीराच्या विविध भागांवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती होती. परंतु, वैज्ञानिकांनी केलेल्या या आढाव्यात स्पष्ट केले की मोबाइल फोनच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा कर्करोगाशी कोणताही ठोस संबंध नाही.

तथापि, संशोधकांनी हे देखील सूचित केले की दीर्घकाळ मोबाइलचा योग्य वापर करण्याचे नियम पाळणे आवश्यक आहे. मोबाइल फोनच्या अतिवापरामुळे इतर काही समस्यांचा धोका संभवतो, जसे की डोळ्यांचे ताण आणि निद्रानाश.

Mobile Overuse causes to Brain Cancer
AI in Judiciary : न्यायपालिका क्षेत्रात AIची एंट्री! ‘लेक्सलेगिस’ सोडविणार कायद्याचा गुंता; नेमकं काय आहे खास? पाहा

त्यामुळे वापरकर्त्यांनी मोबाइल फोनचा वापर करताना काळजी घ्यावी आणि शक्यतो ईयरफोन किंवा स्पीकरचा वापर करावा.

हा आढावा जाहीर झाल्यानंतर लोकांमध्ये मोबाइल वापराबद्दल सकारात्मकता वाढली असून आरोग्याविषयी असलेल्या अनेक शंकांचे निराकरण झाले आहे.

Mobile Overuse causes to Brain Cancer
Eye Care : काय खरंच प्रेस्वु आय ड्रॉप्स चष्मा दूर करतं? किंमत किती,कुणी वापरावं,वाचा एका क्लिकमध्ये..

काही महत्वाचे प्रभाव पुढीलप्रमाणे आहेत -

डोळ्यांवरील परिणाम: सतत स्क्रीनकडे बघितल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो तर ड्राय आय सिंड्रोम, आणि डोळ्यांमध्ये जळजळ होण्याचा धोका वाढतो.

झोपेची समस्या: झोपण्यापूर्वी मोबाइलचा वापर केल्यास ब्लू लाईटमुळे मेंदूवर परिणाम होतो, त्यामुळे झोपेची वेळ बदलते. ज्यामुळे झोपण्यास त्रास होतो.

वजन वाढणे आणि शारीरिक हालचालींमध्ये घट: मोबाइल आणि इतर डिजिटल उपकरणांचा जास्त वापर केल्यामुळे लोकांची शारीरिक हालचाली कमी होते, ज्यामुळे वजन वाढणे आणि इतर आरोग्याच्या समस्या जाणवतात.

मेंटल हेल्थ: सोशल मीडिया आणि इतर ऍप्सच्या जास्त वापरामुळे ताण, चिंता, आणि नैराश्य यासारख्या समस्या वाढणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.