Egypt Cancer Treatment : इजिप्तमध्ये ४००० वर्षांपूर्वी व्हायचा कॅन्सरवर उपचार ; संशोधनातून आश्चर्यदायक माहिती आली समोर

Ancient Cancer Research: संशोधनामुळे कर्करोगावरील प्राचीन आयुर्वेदिक उपचारांचा उलघडा होणार : प्रा.एडगार्ड कामारोस
Ancient Egyptian Medicine: Cancer Treatments Found in 4,000 Year Old Skulls
Ancient Egyptian Medicine: Cancer Treatments Found in 4,000 Year Old Skullsesakal
Updated on

Egypt Research : इजिप्तची प्राचीन संस्कृती वैदिकांप्रमाणेच औषधांमध्ये आणि शस्त्रक्रियामध्ये अतिशय निपुण होती हे आपल्याला माहीत आहे. परंतु, आता एका नवीन संशोधनाने त्यांच्या ज्ञानाचा आणखी विस्तार केला आहे. संशोधनात सापडलेला हजारो वर्ष जुना खोपरा स्पष्ट करतोय की तेव्हा प्राचीन इजिप्तियन लोकांना कर्करोगाची जाण होती आणि त्यावर उपचार करण्याचा प्रयत्नही करत होते.

संशोधकांच्या एका आंतरराष्ट्रीय टीमने हजारो वर्ष जुने दोन खोपरे अभ्यासले. या अभ्यासाचा उद्देश होता प्राचीन काळात कर्करोगाचा प्रादुर्भाव किती होता आणि त्यावर त्या काळातील समाज कसा उपचार करत असेल याचा शोध घेणे.

"प्राचीन इजिप्तियन जटिल डोक्याच्या फ्रॅक्चरवर उपचार करू शकत होते, पण कर्करोग हा त्यांच्यासाठी वैद्यकीय ज्ञानाच्या सीमेवर होता," असे संशोधनाचे प्रमुख लेखक तातियाना टोंडिनी यांनी सांगितले.

Ancient Egyptian Medicine: Cancer Treatments Found in 4,000 Year Old Skulls
Sam Altman Donation Pledge : दानशूर सॅम अल्टमन! अर्धी संपत्ती करणार दान; बिल गेट्स, इलॉन मस्कच्या पावलावर पाऊल

संशोधनातर्गत दोन खोपरे एक 30 वर्षीय पुरुष आणि एक 50 वर्षीय स्त्री यांचे असून ते अनुक्रमे 2687 ते 2345 ईसापूर्व आणि 663 ते 343 ईसापूर्व या काळात जगले. त्यापैकी एका खोपऱ्यावर (खोपरा क्रमांक 236) केलेल्या सूक्ष्म निरीक्षणातून अस्थींच्या असमान वाढीचे (neoplasm) लक्षणे आढळली. याशिवाय खोपऱ्यावर सुमारे 30 पेक्षा जास्त लहान आणि गोल आकाराच्या कर्करोगाच्या पेंढ्या दिसून आल्या.

पण सर्वात धक्कादायक म्हणजे या गाठींच्या जवळ धारदार धातूच्या शस्त्राने केले असावे असे खूण आढळले. यावरून प्राचीन इजिप्तियन लोकांनी कदाचित कर्करोगावर शस्त्रक्रिया करण्याचाही प्रयत्न केला असावा असा संशोधकांचा अंदाज आहे. त्याच खोपऱ्यावर आणखी दोन जुन्या जखमांचेही पुरावे सापडले आहेत. त्यापैकी एक जखम जवळून झालेल्या एखाद्या हिंसक घटनेतून झाली असावी असे दिसते. या जखमांचे बरे होणे म्हणजे त्या व्यक्तीला कदाचित उपचार मिळाले असून त्यामुळे तो/ती वाचली असण्याची शक्यता आहे.

Ancient Egyptian Medicine: Cancer Treatments Found in 4,000 Year Old Skulls
Archaeological Find in China : चीनमधील उत्खननात सापडल्या २००० वर्षांपूर्वीच्या 'या' वस्तू ; ४४५ थडगी,हाडांपासून बनवलेल्या कलाकृतींचा समावेश

हे सर्व आढळलेले पुरावे हे प्राचीन इजिप्तमधील कर्करोगाच्या उपचार पद्धतींबद्दल अधिक संशोधन करण्याची दिशा दाखवतात. भविष्यात या क्षेत्रात होणाऱ्या संशोधनामुळे कर्करोगावरील आयुर्वेदामध्ये प्राचीन इजिप्तचा काय वाटा होता याचा उलगडा होऊ शकेल, असे संशोधनाचे प्रमुख लेखक प्रा. एडगार्ड कामारोस यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.