IRCTC Password Recovery : IRCTC पासवर्ड विसरलात? चिंता करू नका, 'या' दोन सोप्या मार्गांनी करा रिकव्हर

Password Reset : फक्त मोबाईल आणि इमेल करेल तुमचे काम सोप्पे,क्षणात परत मिळवा पासवर्ड
Step by step irctc password recovery
Step by step irctc password recoveryesakal
Updated on

IRCTC : रेल्वे तिकीट बुकिंग करण्याची पद्धत आता सोपी झाली आहे. कारण IRCTC मुळे तुम्ही ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक आणि कॅन्सल करू शकता. पण इतर अनेक ऑनलाईन सेवांप्रमाणे, IRCTC ला वापरण्यासाठी तुमच्याकडे लॉगिन आयडी आणि पासवर्ड असणे आवश्यक आहे. तिकीट बुक करताना हा पासवर्ड लागतो, अगदी थर्ड पार्टी अॅप्स वापरत असाल तरीही.

एखाद्या वेळी,जास्त वेळ वापर न केल्यामुळे किंवा कमी प्रवास करणारे लोक त्यांचा पासवर्ड विसरू शकतात. पण चिंता करण्याची गरज नाही. तुमची नोंदणीकृत ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर वापरून तुमचा पासवर्ड पुन्हा मिळवण्यासाठी आणि रीसेट करण्यासाठी IRCTC ऑनलाईन सुविधा देते. IRCTC पासवर्ड रीसेट करण्यासाठी २ सोप्या पद्धती आहेत.

Step by step irctc password recovery
Laptop Screen Cleaning : लॅपटॉपची स्क्रिन करा सुरक्षितपणे क्लीन; घरच्या घरी वापरून पाहा 'या' सोप्या स्टेप्स

1. नोंदणीकृत ईमेल आयडी वापरून IRCTC पासवर्ड रिकव्हर करा

IRCTC ची अधिकृत वेबसाइट https://www.irctc.co.in/nget/train-search भेट द्या.

'फॉरगेट पासवर्ड' लिंकवर क्लिक करा.

तुमचा युजरनेम टाका आणि पुढच्या स्टेपवर जा.

सिक्युरिटी प्रश्न येईल. हा प्रश्न तुमच्या अकाउंट रेजिस्ट्रेशनच्या वेळी सेट केला होता. या प्रश्नाचे उत्तर आठवणं महत्वाचे आहे.

सिक्युरिटी प्रश्नाचे बरोबर उत्तर दिल्यावर, IRCTC कडून तुम्हाला ईमेल येईल. या ईमेलमध्ये तुमचा पासवर्ड रीसेट करण्याच्या सूचना असतील.

ईमेलमधील सूचनांचे पालन करून तुमचा पासवर्ड रीसेट करा. भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी स्ट्रॉंग आणि लक्षात राहणारा पासवर्ड निवडा.

2. नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरून IRCTC पासवर्ड रीसेट करा

ईमेल रिकव्हरी प्रमाणे, IRCTC ची वेबसाइट भेट द्या आणि 'फॉरगेट पासवर्ड' लिंकवर क्लिक करा.

तुमचा युजरनेम आणि दाखवलेला Captcha कोड टाका आणि पुढे जा.

पासवर्ड रिकव्हरी पेजवर जा. येथे तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका.

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी (वन-टाइम पासवर्ड) पाठवला जाईल. हा ओटीपी पासवर्ड रिकव्हरी पेजवर टाका.

ओटीपी टाकल्यानंतर, तुम्हाला नवीन पासवर्ड टाकण्यास सांगेल. नवीन पासवर्ड पुन्हा टाकून पुष्टी करा.

Captcha कोड टाका आणि तुमचा नवीन पासवर्ड सबमिट करा.

तुमचा पासवर्ड स्ट्रॉंग करण्यासाठी, अक्षरे, नंबर आणि विशेष चिन्हे असलेला पासवर्ड बनवा. सोपे शब्द आणि ओळखता येणारे शब्द टाळा, जसे 'पासवर्ड123' किंवा 'abcdef'.

Step by step irctc password recovery
WhatsApp Features : आता व्हॉट्सॲप Status वर वॉईस रेकॉर्डींग पोस्ट करता येणार; वाचा आणखी नवीन फिचर्स

अडचण येत असल्यास काय कराल?

वरील पद्धतींमुळे अडचण येत असल्यास, IRCTC चा ग्राहक सेवा विभाग तुमच्या मदतीसाठी नेहमी उपलब्ध आहे. त्यांच्याशी संपर्क साधून तुमचा पासवर्ड पुन्हा मिळवण्यासाठी आणि तुमच्या खात्यावर प्रवेश मिळवण्यासाठी मदत घ्या.

आता, विसरलेल्या पासवर्डची चिंता न करता, पुन्हा सहजतेने तुमची रेल्वे तिकीट बुक करा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.