Monsoon Electric Gadgets : पावसाळा आला रे आला की रंगबिरंगी छत्री आणि रेनकोट आपल्याला सगळीकडे दिसू लागतात. आजकालच्या घाईगडबडीच्या जगात पाऊस पडला की छत्री सोबत ठेवणे गरजेचे असतेच पण प्रवासात छत्रीसोबत ठेवणे जरा अवघड होऊन बसते. पण आता Xiaomi Youpin ची Risetime स्मार्ट इलेक्ट्रीक छत्री ही तुमच्या या समस्यांवर तोड आहे. ही छत्री एका टचवरुन फक्त 2 सेकंदात उघडते आणि बंद होते.
छत्रीच्या दांड्यावर असलेल्या दोन बटनांवर दाबून तुम्ही सहजतेने छत्री वापरू शकता. विशेषत: अचानक आलेल्या पावसापासून वाचण्यासाठी ही छत्री खूप उपयुक्त आहे. Risetime ची ही खास गोष्ट म्हणजे त्याच्यात लिथियम बॅटरी आहे जी 150 वेळा छत्री उघडण्या-बंद करण्याइतका चार्ज देते.
ही बॅटरी फक्त 1.5 तासात पूर्ण चार्ज होते आणि त्यानंतर ती 180 दिवसांपर्यंत ( साधारणपणे संपूर्ण पावसाळ्यात) टिकते असे कंपनीचे म्हणणे आहे. बॅटरी संपली तर छत्री आपोआपच बंद होते पण उघडत नाही. त्यासाठी तुम्हाला ती पुन्हा चार्ज करावी लागेल. ही छत्री वॉटरप्रूफ आणि टचस्क्रीन आहे.
सुरक्षेच्या दृष्टीनेही ही छत्री उत्तम आहे. उलट्या बाजूने उघडणारी आणि बंद होणारी ही छत्री वापरताना भिजलेला भाग आतल्या बाजूला राहतो. तसेच, IPX4 वाटरप्रूफ असलेला दांडा आणि UPF50+ इतका सूर्यकिरणांपासून बचाव करणारा कपडा वापरला आहे.
aluminum मिश्र धातूचा बनलेला मजबूत फ्रेम आणि लेवल 5 इतका एयर कंट्रोल या छत्रीच्या वैशिष्ट्यांमध्ये समाविष्ट आहेत. रात्रीच्या वेळी वाहनांवरून येणारा प्रकाश परावर्तित करणारी एज ही देखील या छत्रीची एक खासियत आहे. या थर्ड पार्टी Risetime ब्रँडची ही स्मार्ट इलेक्ट्रीक छत्री Youpin वर फक्त 129 युआन (₹1800) इतक्या किंमतीत उपलब्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.