रोबोट शोधणार दूषित पाणी! चेन्नईची एजन्सी पालिकेसमोर करणार सादरीकरण

Robot: तांत्रिक बिघाडामुळे शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळित होतो
Robot
RobotSakal
Updated on

Robot: शहरात नळाला नेहमी गढूळ आणि ड्रेनेजमिश्रित दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी नागरिक करतात. अशा वेळी नळात लिकेज नेमके कुठे आहेत, ज्यामुळे पाणी दूषित येते. हे शोधण्यात अधिकाऱ्यांना कसरत करावी लागते. आता चक्क इंडोबोट हा रोबोट कॅमेरा याचा शोध घेणार आहे. चेन्नईची एजन्सी याचे प्रात्यक्षिक महापालिकेसमोर सादर करणार आहे.

तांत्रिक बिघाडामुळे शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळित होतो. परिणामी, अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने, शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. यासह अनेकदा नळातून ड्रेनेजमिश्रित दुर्गंधीयुक्त पाणी येते. अनेक वॉर्डात असेच चित्र पाहायला मिळते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित राहतो.

यावर उपाययोजना करावी, यासाठी महापालिकेसमोर मोर्चे, आंदोलने केली जातात. नळाला दूषित पाणी येते कुठून हे शोधण्यासाठी जागोजागी खोदकाम करावे लागते. यानंतरही परिस्थिती पुन्हा जैसे थे होते. त्यामुळे प्रशासनाची अडचण होते. आता नळांमध्ये नेमके लिकेज कुठे आहेत, याचा शोध हा रोबोटिक कॅमेरा घेईल.

Robot
Auto Tech Expo 2025 : सगळ्या ई-कार आता एकाच छताखाली, मनाप्रमाणे करा पसंत; कधी आणि कुठे भरतंय ऑटो एक्सपो? जाणून घ्या

असे करेल काम

दूषित पाणी येणाऱ्या ठिकाणी हा रोबोट कॅमेरा सोडला जाईल. रिमोटच्या साह्याने दोन्ही बाजूने तो तीनशे फुटापर्यंत म्हणजे, शंभर मीटर आत जाऊन लिकेजेसचा शोध घेईल. लाइव्ह प्रेक्षपण कॅमेऱ्याशी जोडलेल्या मोबाईलवर दिसेल. परिणामी, लिकेज कुठे आहेत हे लक्षात येईल.

हा रोबोट कॅमेरा अगदी लहान आहे. आत दोन्ही बाजूला तीनशे फुटापर्यंत लिकेजचा शोध घेईल. यामुळे दुरुस्ती करून दूषितपाणी पुरवठ्यापासून सुटका मिळेल. जुलैच्या पहिल्या आठवड्यात याचे प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे. हे यशस्वी होईल असा आम्हाला विश्वास आहे.

— के.एम. फालक, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.