जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रीक विमान विकसित केल्याचा रोल्स रॉइसचा दावा

World's Fastest all-Electric Aircraft: जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक विमान विकसित केल्याचा रोल्स रॉइसने (Rolls Royce) दावा केला आहे
World's Fastest all-Electric Aircraft by Rolls Royce
World's Fastest all-Electric Aircraft by Rolls RoyceSAKAL
Updated on

जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रीक विमान (World's Fastest all-Electric Aircraft):

ब्रिटीश एरो इंजिन निर्माता रोल्स-रॉइसने जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक विमान विकसित केल्याचा दावा केला आहे. कंपनीने या विमानाला 'स्पिरिट ऑफ इनोव्हेशन' (Spirit of Innovation) असे म्हटलं असून या विमानाने उड्डाण करताना 387.4 mph (623km/h) कमाल वेग गाठला असल्याचा दावा केला आहे. रोल्स-रॉइसने या विमानाला 'जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक विमान' म्हटले आहे. दोन महिन्यांपूर्वी उड्डाण करताना विमानाचा वेग 3km पर्यंत सरासरी 555.9 किमी प्रतितास आणि 15km पेक्षा जास्त अंतरावर 532.1 किमी प्रतितास होता.

Rolls-Royce ने एका प्रेस स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, Spirit of Innovation ने 16 नोव्हेंबर रोजी 1.86 मैलांवर 345.4 mph वेगाने पोहोचण्यासह एकूण तीन जागतिक विक्रम प्रस्थापित केले.

World's Fastest all-Electric Aircraft by Rolls Royce
Rolls-Royce ची तब्बल 202 कोटींची जगातील सर्वात महागडी कार

युकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी विमान चाचणी साइटवर विल्टशायरमध्ये विमानाने 300 मैल प्रतितास वेगाने उड्डाण केले, जे मागील रेकॉर्डपेक्षा 182 मैल वेगवान आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

हे आकडे पडताळणीसाठी स्पोर्ट्स ग्लोबल गव्हर्निंग बॉडी Fédération Aéronautique Internationale (FIA) कडे सादर केले गेले आहेत.

एक्सलेरेटिंग द इलेक्ट्रीफिकेशन ऑफ फ्लाइट (ACCEL) प्रकल्पाचा एक भाग म्हणून असेंबल केलेले आणि एरोस्पेस टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (ATI), डिपार्टमेंट फॉर बिझनेस, एनर्जी अँड इंडस्ट्रियल स्ट्रॅटेजी आणि इनोव्हेट यूके द्वारे वित्तपुरवठा केलेले, हे विमान 400kW च्या इलेक्ट्रिक पॉवरट्रेनवर चालते.

World's Fastest all-Electric Aircraft by Rolls Royce
5G विमान प्रवाशांसाठी का ठरू शकते धोकादायक? एअर इंडियाची सेवा सुरू

रोल्स-रॉयसच्या म्हणण्यानुसार, हे एरोस्पेसमध्ये बनवलेल्या सर्वात पॉवर-डेन्स प्रोपल्शन बॅटरीपॅकवरदेखील चालते.

चाचणी पायलट आणि रोल्स-रॉईस फ्लाइट ऑपरेशन्सचे संचालक फिल ओ'डेल, यांनी उच्च गती पूर्ण केली,ते म्हणाले, "हे माझ्या कारकिर्दीतील महत्त्वाचा क्षण आहे आणि संपूर्ण टीमसाठी ही एक अविश्वसनीय कामगिरी आहे."

ऑल-इलेक्ट्रिक वर्ल्ड-स्पीड रेकॉर्डसाठी दावा करणे ही ACCEL टीम आणि Rolls-Royce साठी एक विलक्षण कामगिरी आहे, असे कंपनीचे CEO वॉरेन ईस्ट म्हणाले.

Rolls-Royce ने या निकालाचे "जेट झिरो' ला वास्तव बनवण्यात मदत करणारा आणखी एक मैलाचा दगड" म्हणून स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.