Royal Enfield Bike: एकच नंबर! चक्क निम्म्या किंमतीत मिळतेय Royal Enfield ची बाईक, कोठून कराल खरेदी?

Royal Enfield Classic 350 बाईकला खरेदी करण्याची चांगली संधी आहे. बाईकच्या सेकंड हँड मॉडेलला तुम्ही निम्म्या किंमतीत खरेदी करू शकता.
Royal Enfield Classic 350
Royal Enfield Classic 350Sakal
Updated on

Royal Enfield Classic 350 Bike Offer: भारतीयांमध्ये Royal Enfield च्या बाईक्सबाबत प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. खासकरून, कंपनीच्या Royal Enfield Classic 350 ला भारतीय ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. बाईकच्या जास्त किंमतीमुळे अनेकजण खरेदी करणे टाळतात. तुम्ही देखील जास्त किंमतीमुळे रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० खरेदी करणे टाळत असाल, तर काळजी करू नका. या बाईकला तुम्ही चक्क निम्म्या किंमतीत खरेदी करू शकता.

हेही वाचा- Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ला आपल्या इंजिन, स्टाइल आणि माइलेजसाठी ओळखले जाते. बाईकची सुरुवाती किंमत १.९० लाख रुपये आहे. तर टॉप व्हेरिएंटची सुरुवाती एक्स-शोरुम किंमत २.२१ लाख रुपये आहे. तुम्हाला जर या बाईकसाठी २ लाख रुपये खर्च करायचे नसल्यास काळजी करू नका. तुम्ही चांगल्या स्थितीमध्ये येणाऱ्या बाईकच्या सेकंड हँड मॉडेलचा विचार करू शकता. Royal Enfield Classic 350 च्या सेकंड हँड मॉडेलला कोठून खरेदी करू शकता, त्याविषयी सविस्तर जाणून घ्या.

Royal Enfield Classic 350
Mobile Recharge: Airtel-Vi ची उडाली झोप! Jio चा खूपच स्वस्त प्लॅन लाँच, ५०GB डेटाचा मिळेल फायदा
Royal Enfield Classic 350
Royal Enfield Classic 350

DROOM वरून करा खरेदी

तुम्ही Royal Enfield Classic 350 चे सेकंड हँड मॉडेल DROOM च्या वेबसाइटवरून खरेदी करू शकता. साइटवर २०१३ चे मॉडेल उपलब्ध आहे. या मॉडेलची किंमत ६० हजार रुपयांपासून सुरू होते. बाईकवर फायनान्सचा देखील पर्याय मिळेल.

OLX वरही स्वस्तात मिळेल रॉयल एनफील्डची बाईक

OLX वरून तुम्ही रॉयल एनफील्डचे २०१२ चे मॉडेल खरेदी करू शकता. या बाईकची किंमत फक्त ५५ हजार रुपये आहे.

Royal Enfield Classic 350
Royal Enfield Classic 350

फक्त ७० हजारात बाईक होईल तुमची

BIKES4SALE वेबसाइटवर देखील Royal Enfield Classic 350 आकर्षक डीलसह उपलब्ध आहे. साइटवर या बाईकचे २०१५ चे मॉडेल उपलब्ध आहे. बाईकला तुम्ही फक्त ७० हजार रुपयात खरेदी करू शकता. मात्र, लक्षात घ्या की सेकंड हँड बाईक खरेदी करताना आधी संपूर्ण माहिती घ्या. अनेकदा कमी किंमतीत बाईक खरेदी करताना फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे सेकंड हँड बाईक खरेदी करताना कंडिशन आणि कागदपत्रं दोन्ही पाहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.