आपल्या दमदार बाईक्ससाठी रॉयल एनफिल्ड कंपनी देशात प्रसिद्ध आहे. या कंपनीची बुलेट बाईक तर स्टेटस सिम्बॉल समजली जाते. रॉयल एनफिल्डनेच भारतात पहिल्यांदा डिझेल बाईक लाँच केली होती. आता हीच कंपनी थेट इलेक्ट्रिक बाईक लाँच करणार आहे. एनफिल्डचे सीईओ बी. गोविंदराजन यांनी या बाईकबद्दल महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे.
"ईव्हीच्या प्रवासात आम्ही सातत्याने प्रगती करत आहोत. रॉयल एनफिल्डचा ईव्ही प्रवास सध्या टॉप गिअरमध्ये आहे. रॉयल एनफिल्डचा मजबूत डीएनए आणि इलेक्ट्रिक फीचर्स हे एकत्र करून एक खास इलेक्ट्रिक बाईक बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे." असं गोविंदराजन म्हणाले.
कधी होणार लाँच?
रॉयल एनफिल्डची पहिली इलेक्ट्रिक बाईक (Royal Enfield first Electric bike) पुढच्या वर्षीपर्यंत लाँच होऊ शकते. सध्या या बाईकला 'कोडनेम एल' असं नाव देण्यात आलं आहे. ही एक संपूर्ण सीरीज असणार आहे, असं कंपनीच्या सीईओंनी सांगितलं. या सीरीजमधील गाड्यांना सध्या एल१ए, एल१बी आणि एल१सी अशी नावं देण्यात आली आहेत.
कसं असेल डिझाईन?
ही बाईक दिसायला कशी असेल याबाबत कंपनीने अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, आपल्या इतर 'क्लासिक' थीम असलेल्या गाड्यांप्रमाणेच या इलेक्ट्रिक गाड्यांचे डिझाईन देखील असू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
चाचणी सुरू
कंपनीने गेल्या वर्षीच इलेक्ट्रिक बाईक्सबद्दल घोषणा केली होती. त्यानंतर आता या बाईकबाबत हळू-हळू इतर माहिती समोर येत आहे. याच्या प्रोटोटाईपची चाचणी सुरू करण्यात आली आहे. आता या बाईकमध्ये कोणते फीचर्स असतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार, रॉयल एनफिल्डच्या चेन्नईमधील प्लांटमध्ये या बाईक्स तयार करण्यात येणार आहेत. यासाठी कंपनीने शहराबाहेर ६० एकर जमीन ताब्यात घेतली आहे. तसेच, या प्रोजेक्टमध्ये पुढील एक ते दोन वर्षांमध्ये सुमारे एक हजार कोटी रुपये गुंतवण्याची कंपनीची योजना आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.