पुणे : रॉयल एन्फिल्डने ४५० सीसी क्षमतेची भारदस्त आणि दमदार गोरिला बाईक दाखल केली आहे. ती लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आरामदायी आहे. या बाईकमध्ये हिमालयन ४५० प्रमाणे नवे आणि ॲडव्हान्स्ड ४५२ सीसीचे सिंगल सिलिंडर लिक्विड कुल्ड शेरपा इंजिन दिले आहे. गोरिला-४५० ही ८ हजार आरपीएमपर्यंत ४० पीएसपर्यंत कमाल ऊर्जा आणि ५५०० आरपीएमपर्यंत ४० न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करेल.