Royal Enfield ने भारतात लाँच केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत

royal enfield hunter 350 launched in india check price and all details
royal enfield hunter 350 launched in india check price and all details
Updated on

तुम्ही रॉयल इनफिल्ड बाईक विकत घेण्याचा विचार करत असाल तर Royal Enfield Hunter 350 अखेर भारतात लॉन्च झाली आहे. हे रेट्रो, मेट्रो आणि मेट्रो रिबेल या तीन व्हेरिएंटमध्ये सादर केले गेले आहे, ज्याची किंमत 1.49 लाख रुपये ते 1.68 लाख रुपये (एक्स-शोरूम) याच्या दरम्यान आहे. ही कंपनीची सर्वात स्वस्त आणि छोटी मोटरसायकल आहे. त्यामुळे तुमच रॉयल इनफिल्ड विकत घेण्याचं स्वप्न पुर्ण होऊ शकते..

दरम्यान या नवीन रॉयल एनफिल्ड बाईक 349cc, सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक एअर-ऑइल कूल्ड इंजिनद्वारे समर्थित आहे जे इंधन इंजेक्शन तंत्रज्ञान असलेले इंजिन आहे. 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले त्याचे इंजिन 6100rpm वर 20.2bhp पॉवर आणि 4,000rpm वर 27Nm पर्यंत टॉर्क जनरेट करते. हंटर 350 चा टॉप स्पीड 114kmph आहे.

RE हंटर 350 ही भारतातील सर्वात लहान रॉयल एनफिल्ड मोटरसायकल आहे ज्याचा व्हीलबेस 1370mm लांब आहे, जो Meteor आणि Classic 350 पेक्षा लहान आहे. बाईकमध्ये 25 डिग्री शार्प रेक एंगल आहे. यात 13-लिटरची इंधन टाकी दिली असून RE Hunter 350 चे सर्व व्हेरिएंट ड्युअल-चॅनल ABS (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम) सह येतात.

royal enfield hunter 350 launched in india check price and all details
एकाच प्लॅनमध्ये मिळवा नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम अन् डिस्ने प्लस हॉटस्टार

ही नवीन रॉयल एनफिल्ड 350cc बाईक 6 पेंट स्कीममध्ये ऑफर केली आहे - रेबेल रेड, रिबेल ब्लू, रिबेल ब्लॅक, डॅपर ग्रे, डॅपर अॅश आणि डॅपर व्हाइट, तसेच RE हंटर 350 रेट्रो-स्टाईल डिझाइनसह साउंड हेडलॅम्प, सर्क्युलर टर्न इंडिकेटर्स, IRVM आणि टेललाइट्स यांसारख्या फीचर्ससह येते. यात टीयरड्रॉपच्या आकाराची इंधन टाकी आहे ज्यावर रॉयल एनफिल्ड बॅज दिल्या आहेत.

royal enfield hunter 350 launched in india check price and all details
CM तिसऱ्या रांगेत, राष्ट्रवादीच्या टीकेला भाजपचं प्रत्युत्तर; म्हटलं स्वाभिमानाच्या...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.