Royal Enfield Scrum 411 अखेर आज म्हणजेच 15 मार्च रोजी भारतात लाँच करण्यात आले आहे. हिमालयन बेस्ड ही मोटरसायकल भारतीय बाजारपेठेत 2.03 लाख रुपयांना (एक्स-शोरूम) लाँच करण्यात आली आहे. रॉयल एनफील्ड स्क्रॅम 411 ही कंपनीच्या मते ADV क्रॉसओवर आहे, जी एडव्हेंचर बाईक आणि स्क्रॅम्बलर्स यांना एकत्र करते. Royal Enfield Scrum 411 इंजिन आणि प्लॅटफॉर्मच्या बाबतीत हिमालयनशी बरेच साधर्म्य दाखवते. याच्या टॉप स्पेक व्हेरिएंटची किंमत 2.08 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
कलर ऑप्शन्स
रॉयल एनफिल्ड स्क्रॅम 411 च्या पेंट स्कीम बद्दल बोलायचे झाल्यास, रॉयल एनफील्ड स्क्रॅम 411 अनेक रंग पर्यायांसह ऑफर केली गेली आहे, ज्यात पांढरा आणि लाल, राखाडी आणि लाल, राखाडी आणि पिवळा आणि काळा आणि लाल यांचा समावेश आहे.
RE Scram 411 चे फीचर्स
RE Scram 411 मध्ये समोरचा मोठी विंडस्क्रीन, स्प्लिट सीट, स्टँडर्ड लगेज रॅक, पुढच्या मोठ्या चाकाऐवजी लहान चाके, कमी सस्पेंशन ट्रॅव्हल, सिंगल सीट आणि मागील पिलर ग्रॅब हँडल्स दिले आहेत. जे अधिक हायवे क्रूझिंगसाठी प्रभावी ठरेल. हिमालयनच्या तुलनेत, Scrum 411 ला सेकंडरी फेंडर्स, उंच विंडस्क्रीन किंवा रॅपराउंड फ्रेम दिली नाही आणि स्प्लिट सीट एवजी सिंगल-पीस सीट दिल्या गेल्या आहेत. मागील लगेज रॅक देखील ग्रॅब रेलने बदलण्यात आले आहे.
डायमेंशन्स
या दमदार मोटरसायकलच्या डायमेंशन्स बद्दल बोलायचे झाले तर, तिचा व्हील बेस-1455 एमएम, ग्राउंड क्लीयरन्स 200 एमएम, लांबी 2160 एमएम, रुंदी 840 एमएम, उंची 1165 एमएम, सीटची उंची 795 एमएम, मोटारसायकलचे वजन 185 किलोग्रॅम आहे, फ्युअल क्षमता 15 लिटर एवढी आहे.
रॉयल एनफील्ड स्क्रॅम 411 इंजिन
हिमालयन स्क्रम 411 च्या पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, याला 411 cc, सिंगल सिलेंडर, फोर स्ट्रोक, एअर-कूल्ड SOHC, फ्युएल इंजेक्शन दिले गेले आहे जे 24.3 bhp पॉवर आणि 32 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हिमालयनच्या तुलनेत स्क्रम थोड्या वेगळ्या फॅशनमध्ये दिसत आहे. या मोटरसायकलला 5 गिअर्स आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.