नवी दिल्ली : अनेक दिवसांपासून ग्राहक राॅयल एनफिल्डच्या नवीन बाईकच्या लाँचिंगची प्रतिक्षा करित आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नवीन क्लासिक ३५० लाँच केल्यानंतर मागील सहा महिन्यांत वेगवेगळ्या प्रसंगी आगामी मोटारसायकली टेस्टिंग दरम्यान भारतीय रस्त्यांवर दिसली आहे. यात राॅयल एनफिल्ड स्क्रॅम ४११ (Royal Enfield Scram 411) ही आहे. अॅडव्हेंचर सेगमेंटच्या या बाईकला स्वस्त हिमालयन मानले जात आहे. कारण ही काही प्रमाणात हिमालयनसारखी असेल. मात्र हिमालयनच्या तुलनेत बरेच डिझाईन आणि फिचर एलिमेंट्स कमी असू शकतात. (Royal Enfield To Be Launch Scram 411 Adventure Bike)
काय आहे खास?
नुकतेच आगामी राॅयल एनफिल्ड (Royal Enfield) स्क्रॅम ४११ शी संबंधित काही माहिती समोर आली आहे. त्यात विंडस्क्रिनसह फ्रंट फेंडर आणि फ्रंट आणि रिअर रॅक्स नसेल. तसेच स्क्रॅम ४११ मध्ये १९ इंचाचे फ्रंट व्हिल राहिल. हिमालयनमध्ये २१ इंचाचे फ्रंट व्हिल आहे. त्याबरोबरच टर्न इंडिकेटरही वेगळ्या डिझाईनमध्ये मिळेल. स्क्रॅम ४११ मध्ये हिमालयनप्रमाणे सर्क्युलर हेडलॅम्प, रिअर व्ह्यू मिरर, वायर स्पोक व्हिल, स्प्लिट सीट्स आणि सिंगल पीस ग्रॅब रेलसह अपस्वेप्ट एग्झाॅट पाहायला मिळेल. बहुतेक अशी शक्यता आहे, की स्क्रॅम ४११ मध्ये ही अद्ययावत हिमालयनप्रमाणे टर्न बाय टर्न नॅव्हिगेशनची सुविधाही पाहायला मिळेल.
फिचर्स आणि किंमत
आगामी राॅयल एनफिल्ड स्क्रॅम ४११ मध्ये हिमालयनप्रमाणे ४११ सीसीचे सिंगल सिलिंडर एअर कोल्ड इंजिन असेल, त्यात २४.३ बीएचपीचे पाॅवर आणि ३२ एनएम टाॅर्क जेनरेट करण्याची क्षमता असेल. नवीन अॅडव्हेन्चर बाईक स्क्रॅम ४११ ला २ लाखांपर्यंत सुरुवातीच्या किंमतीत लाँच केले जाऊ शकते. राॅयल एनफिल्ड या वर्षी वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये खास मोटारसायकली लाँच करण्याच्या तयारीत आहे. यात कम्युटर सेगमेंटमध्ये हंटर ३५० सह टूरर आणि क्रूझर सेगमेंटमध्ये शाॅटगन ६५० आणि सुपर मीटियाॅर ६५० सारख्या दमदार बाईक्स असतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.